The Burn Restaurant Saam TV
क्राईम

The Burn Restaurant: वांद्र्यातील 'द बर्न' रेस्टॉरंटला व्यवसाय बंद करण्याचे निर्देश; अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Mumbai News:

मुंबईच्या वांद्रे (Bandra) पश्चिमेकडील एका प्रसिद्धी हॉटेलमध्ये चिकन डिशमध्ये उंदीर सापडल्याच्या प्रकारानंतर एफडीए ऍक्शन मोडमध्ये आली आहे. एफडीएकडून मुंबईतील जवळपास ६८ हॉटेल्सना कारणे दाखवा नोटीस बजावली असून वांद्रे पूर्वेकडील बी आर हॉस्पिटलिटी अंतर्गत येणाऱ्या द बर्न या रेस्टॉरंटवर कारवाईचा बडगा उगारत व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

द बर्न रेस्टॉरंटकडून अन्न सुरक्षा आणि मानकांच्या अनुसूची IV चे उल्लंघन (खाद्य व्यवसायांचे परवाना आणि नोंदणी), परवाना अटींचे उल्लंघन, रेस्टॉरंटमध्ये कालबाह्य वस्तू आढळून आल्यात. तसेच अन्नपदार्थ बनवताना त्यात सिंथेटिक फूड कलर टाकून तयार केल्याचे आढळून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

इतकेच नाही तर रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या मोरी बॉयपासून कुक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यापर्यंत कोणतेही वैद्यकीय फिटनेस रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे देखील कारवाईदरम्यान आढळून आले आहे.

एफडीए आयुक्त अभिमन्यू काळेंसह आयुक्त शैलेश आढाव आणि सहाय्यक आयुक्त अश्विनी रांजणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. शिवाय द बर्न या रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी आणि मांसाहाराचे योग्य पृथक्करण देखील केले जात नसल्याचे तपासणी दरम्यान आढळून आले.

रेस्टॉरंटने NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडून पाण्याचे विश्लेषण अहवाल देखील प्राप्त करून घेतलेला नव्हता. अशा विविध कारणांमुळे अन्न व औषध प्रशासनाने द बर्न रेस्टॉरंटला व्यवसाय बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT