Crime News saam tv
क्राईम

Crime News : धक्कादायक! घराच्या बाजुला सापडला बेपत्ता झालेल्या 5 वर्षीय मुलीचा मृतदेह, नरबळीचा संशय?

Ratnagiri Crime: रत्नागिरीतील एका गावातील ५ वर्षीय चिमुरडीचा फोंडा येथून बेपत्ता होऊन घराच्या बाजूला गाडलेला मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ माजली आहे.

Dhanshri Shintre

रत्नागिरी तालुक्यातील एका गावातील असलेल्या व सध्या फोंडा येथून बेपत्ता झालेल्या 5 वर्षीय चिमुरडीचा मृतदेह घराच्या बाजूलाच गाडलेल्या स्थितीत आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. कसलये-तिस्क फोंडा येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. एका वर्षापूर्वीच चिमुरडीच्या आईने तिला रत्नागिरीतून फोंड्यात आपल्या आईकडे नेले होते. पोलिसांचा असा संशय आहे की, मुलीचा नरबळी दिला गेला आहे. मृतदेहाची तपासणी आणि इतर तपास सुरू करण्यात आले आहेत.

फोंडा पोलिसांनी घराच्या मालक, पप्पू ऊर्फ बाबासाहेब अलाट आणि त्याची पत्नी पूजा अलाट यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मुलीला मारून घराच्या बाजूस पुरल्याचे त्यांनी कबूल केले आहे. यामुळे संशयित पती-पत्नीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. नागरिकांनी संताप व्यक्त करत जादूटोणा करणाऱ्या मांत्रिकाला पोलिसांनी ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. चिमुकलीचा खून झाला की नरबळी याचा गूढ अजूनही स्पष्ट झालेला नाही, पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे.

नेमका प्रकार काय?

फोंडा पोलिसांनी ५ वर्षीय चिमुरडीच्या मृत्यूचा गुन्हा नोंदवला असून, कसलये-तिस्क येथील अमेरा अन्वारी ३ मार्चपासून बेपत्ता होती. तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार फोंडा पोलिस स्थानकात करण्यात आली. पोलिसांनी आरोपी पप्पू ऊर्फ बाबासाहेब अलाट आणि पत्नी पूजा अलाट यांच्याशी चौकशी केली असता, त्यांनी मुलीला मारून घराजवळ पुरल्याचे कबूल केले. स्थानिकांनी हा प्रकार जादूटोणा किंवा नरबळीशी संबंधित असू शकतो असा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून, तपास सुरू आहे. या गूढ घटनेची पूर्ण उकल होण्याची सर्वांना अपेक्षा आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सारी आणि अलाट कुटुंबीय परप्रांतीय असून अनेक वर्षे गोव्यात स्थायिक आहेत. पप्पू आणि पूजा यांना मुलबाळ नाही, त्यामुळे समृद्धी मिळवण्यासाठी नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ५ वर्षांची अमेरा बुधवारी सकाळपासून बेपत्ता झाली, ज्यामुळे कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी तिचा शोध सुरू केला. तिच्या आईने फोंडा पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी तपास सुरू करत घराघरात चौकशी केली. पप्पूला चौकशीदरम्यान गडबडल्याने, आणि गुरुवारी असंबद्ध उत्तरे दिल्याने त्यावर संशय अधिक बळावला आहे. पोलिसांची तपास कार्यवाही चालू आहे.

बाबासाहेब अलाट हे कसलये येथील कुशल वेल्डर आहेत. धारबांदोडा संजीवनी साखर कारखान्याजवळ राहत असतानाच ते कसलये येथे आले. वीस वर्षांचा वैवाहिक जीवन असूनही त्यांना मुलबाळ न झाल्याने समृद्धी आणि मुलासाठी जादू टोण्याचा वापर केल्याचा संशय पोलिसांना आहे. ५ वर्षीय अमेरा अन्वारी आपल्या आई आणि भावंडांसोबत कसलये येथे राहत होती. तिच्या आईचे रत्नागिरीत लग्न झाले होते, मात्र पतीच्या मारझोडीमुळे ती मुलांसमवेत कसलये येथील आईच्या घरी राहायला आली होती. या घटनेने स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaniwarwada Namaz Row: नमाजपठणवरुन महायुतीत जुंपली; मेधाताईंना अटक करण्याची ठोंबरेंची मागणी

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांचा अजब पॅटर्न; घरी बोलावून शेतकऱ्याचं सोडवलं उपोषण

Thackeray vs Shinde: शिंदे 'नरकासूर'; नरक चतुर्दशीवरून उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर विखारी टीका

नवी मुंबईत पालिका निवडणुकीआधी शरद पवार गटात नाराजी उफाळली; आधी बंडखोरी, आता आमलेंना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Bacchu Kadu: आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापा; बच्चू कडूंचं वादग्रस्त वक्तव्य

SCROLL FOR NEXT