Thane Ravikumar Verma Saam TV News
क्राईम

Thane Crime : घर का भेदी लंका ढाए; ठाण्याच्या अभियंत्याची पैशासाठी देशाशी गद्दारी, रवी वर्मा अन् पाकिस्तानचा ISI

Ravikumar Verma : घर का भेदी लंका ढाए. म्हणतात अगदी तसंच देशात घडलंय. ठाण्यातील रवी वर्मा या गद्दारानं पाकिस्तानला भारताच्या नौदलाची गुप्त माहिती दिलीय. मात्र त्याच्या या गद्दारीचा भांडाफोड कसा झाला? आणि त्यानं हे पाप कशासाठी केलं?

Prashant Patil

ठाणे : देशाच्या गद्दारी संदर्भात एटीएसचा दोर पोहोचलाय तो थेट ठाण्याच्या एका अभियंत्याच्या गळ्यात. नाव आहे - रविकुमार वर्मा. आमचा मुलगा हनी ट्रॅपमध्ये अडकला, असं त्याचे कुटुंबिय सांगतात. हा साधाभोळा चेहरा बघून आपल्यालाही एकक्षणाला वाटेल, की जाळ्यात अडकल्याने रवीने हे केलं असावं. पण असं मुळीच नाहीय. या भोळ्या चेहऱ्यामागे लपलाय देशाचा फितूर. याच रवीकुमार वर्माने पैशांच्या हव्यासापोटी देशाचा सौदा केलाय. त्यानं भारतीय नौदलाची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवलीय. नागपाडाच्या ATS हेडक्वार्टर मध्ये झाली २ तास वर्माची चौकशी झालीय. यात गद्दार रवी वर्माचे सगळेच पत्ते उघड झालेत.

रवी वर्माच्या चौकशीत धक्कादायक माहिती

- आरोपी रवी वर्मा विखाखापट्टनला असताना प्रीती नावाची मुलगी संपर्कात

- ऑक्टोबर 2024 मध्ये रवी वर्मा आणि प्रीती जयस्वालचा संपर्क वाढला

- रवी वर्मा नेव्हल डॉकमध्ये आऊटसॉर्सिंगद्वारे फिटर म्हणून नोकरीला

- डॉकमध्ये व्हिडिओ कॉलद्वारे काम असल्याने मोबाईल नेण्यास परवानगी

- नेव्हल डॉकमधील महत्त्वाची जहाजे आणि संवेदनशील माहितीचे फोटो काढले

- 14 भारतीय युद्धनौका आणि पाणबुड्यांच्या माहितीचा पाकला पुरवठा

- युद्धनौकांचे नकाशे, फोटो आणि व्हिडिओ पाकिस्तानतील कथित तरुणीला पाठवले

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थांनी घरभेद्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि याच तपासात एटीएसला रवीच्या गद्दारीची भनक लागली आणि रवी अडकला. एटीएसनं रवीचा फोन तपासला आणि त्याचा भांडाफोड झाला. त्यात रवीच्या गद्दारीचे पुरावेच सापडलेत. त्यामुळे एटीएसनं रवीच्या बँक खात्याची तपासणी केली आणि त्यानं हे कृत्य हनी ट्रॅपमुळं नाही तर चक्कं पैशांसाठी केल्याचं उघड झालंय. मात्र, हनी ट्रॅपमुळेच मुलगा अडकल्याचं रवीची आई सांगतेय..

घरचे मुलाची बाजू घेत असले तरी रवीचं बँक खातं काही वेगळंच सांगतंय. पैशांनी रवीला आंधळं केलं आणि त्यानं देशाच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे आता फक्त रवी वर्माच नाही तर देशाशी गद्दारी करणाऱ्या प्रत्येकाच्या मुसक्या एटीएसनं आवळायला हव्या. एवढंच नाही तर पुन्हा अशा कृत्याचं नावही काढणार नाहीत इतकी कठोर शिक्षा या गद्दारांना द्यायला हवी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

SCROLL FOR NEXT