Thane crime Saam Tv
क्राईम

Thane Crime: कामासाठी गेली पण परत आलीच नाही; ठाण्यात महिला कामगाराची हत्या, तिघांना बिहारमधून अटक

Thane Crime News : ठाण्यातील कळवा परिसरात कामावर जाणाऱ्या महिलेला चोरट्यांनी गाठून तिच्या अंगावरील दागिन्यांची चोरी करून तिची हत्या केली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाणे : ठाण्यात पैशांच्या लालचेपोटी तरुणाने नाक्यावर काम करणाऱ्या महिलेची हत्या केली. या मृत महिलेचं नाव शांती चव्हाण (४० वर्षे) आहे. कामावर घाईघाईत निघालेल्या शांती चव्हाण यांना तरुणांनी लुबाडून त्यांची हत्या केली. स्थानिकांना शांती चव्हाण यांचा मृतदेह कावेरी सेतू रस्त्यालगतील बांधकाम चालू असलेल्या एका इमारतीमध्ये १४ जून रोजी सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शांती चव्हाण या घरातून कामाला जाण्यासाठी निघाल्या मात्र त्या कामावरती पोहचल्या नाहीत. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

ठाण्यातील कळवा परिसरात राहणाऱ्या शांती सुरेश चव्हाण या १४ जून रोजी कामावर निघाल्या होत्या. वाटेत चोरट्याने लुबाडून त्यांच्या अंगावरील दागिने आणि त्यांच्याकडे असलेले पैसे लुबाडले. इतक्यावरच न थांबता या चोरटयांनी शांती चव्हाण यांच्यावर धारधार शस्त्राने वार करुन तसेच गळा आवळून त्यांची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांची तीन पथके आरोपींचा शोध घेत होती. कळवा रेल्वे स्थानकापासून कुर्ला रेल्वे स्थानकापर्यंत एकूण शंभरच्या आसपास सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पोलिसांनी पडताळणी केली.

स्थानिक रिक्षा चालक, हॉटेल व्यावसायिकांकडे चौकशी करण्यात आल्यानंतर तीन आरोपी असल्याची बाब यात आढळली. आरोपी परराज्यात पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची पथके बिहार राज्यातील खगडीया जिल्ह्यात गेली. विश्वजीत राजेंद्रप्रसाद सिंग (३० वर्षे) आणि देवराज मदन कुमार (१७ वर्षे) असे मारेकऱ्यांचे नाव असून या दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. यातील अल्पवयीन मुलाला भिवंडीतील बाल निरीक्षण गृहात रवानगी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman-Shehnaaz: 'तो खूप प्रेमळ आहे...'; शुभमन-शहनाज यांचं नातं काय? सोशल मीडियावर रंगली चर्चा

CV आणि Resume मध्ये काय फरक आहे माहितीये का? 99% लोकांना नसेल माहिती

Winter Skin Care : थंडीत मुलायम त्वचेसाठी लावा 'हा' पदार्थ, कोरडेपणा मिनिटांत होईल दूर

Leopard Liefspan: बिबट्या किती वर्षे जगतो?

Post Office: पोस्टात जाण्याची झंझट संपली, आता मोबाईलवरूनच होणार सर्व कामं; Dak Seva 2.0 अ‍ॅप कसे वापरायचे?

SCROLL FOR NEXT