Thane Crime News  Saam Digital
क्राईम

Thane Crime News: 'मी एकनाथ शिंदेंचा खास माणूस', मुख्यमंत्र्यांच्या नावाने खंडणीसाठी धमकी; ठाण्यात खळबळ

Maharashtra Breaking News: मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन ठाण्यातील एका ज्योतिषाला चक्क दहा लाखांच्या खंडणीसाठी धमकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भट्टर यांनी पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांची भेट घेऊन सर्व प्रकार सांगितला अन् त्यांना तक्रार अर्ज दिला आहे.

Gangappa Pujari

विकास काटे ठाणे, ता. ५ जुलै २०२४

मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन ठाण्यातील एका ज्योतिषाला चक्क दहा लाखांच्या खंडणीसाठी धमकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संकेत पुजारा असे धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी या ज्योतिषाने पोलीस उपायुक्तांकडे तक्रार केली आहे.

परशुराम भट्टर ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात राहणारे असून ते ज्योतिष, कुंडली पाहण्याचे काम करतात. त्यांच्याकडे ज्योतिष आणि कुंडली पाहण्यासाठी बंगळुरू येथील श्रीनिवास विठ्ठल शेट्टी हे गृहस्थ येत होते. त्यांच्याच ओळखीचे सुरेश व्यंकटेश रेड्डी हे देखील भट्टर यांच्याकडे येत होते. भट्टर यांच्या सल्ल्यामुळेच रेड्डी यांची भरभराट होत असल्याने भट्टर यांना चारचाकी वाहन घेण्यासाठी काही रक्कम भेट म्हणून दिली होती. ही रक्कम कधीच परत करू नका, असेही रेड्डी यांनी सांगितले होते.

मात्र, कालांतराने श्रीनिवास शेट्टी, सुरेश रेड्डी यांनी भट्टर यांच्याकडे पैशाची मागणी केली. भट्टर यांनी देखील रेड्डी यांना 30 लाखांचे तीन धनादेश रेड्डी यांनी सांगितल्याप्रमाणेच सुरेश व्ही. या नावाने दिले. पहिले दोन चेक वठल्यानंतर आपल्या खात्यात पैसे आले नाहीत, असा कांगावा करीत रेड्डी यांनी तिसरा चेक थांबवण्यास सांगून पनवेल येथील मा. नगरसेवक संतोष शेट्टी यांना उर्वरित दहा लाख देण्यास सांगितले.

त्यानुसार भट्टर यांनी पाच लाखांचे दोन धनादेश दिले. त्यानंतर 5 जून रोजी संकेत पुजारा याने भट्टर यांच्या कार्यालयात येऊन, तू मुख्यमंत्र्यांच्या नावावर खूप कमाई केलीस. मी एकनाथ शिंदे यांचा खास माणूस असून माझ्यासोबत त्यांचा ड्रायव्हर आला आहे. तू रेड्डी यांची फसवणूक केली असून प्रकरण संपवण्यासाठी मला दहा लाख दे, नाहीतर तुझी वाट लावेन, अशी धमकी दिली. या प्रकरणी भट्टर यांनी पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांची भेट घेऊन सर्व प्रकार सांगितला अन् त्यांना तक्रार अर्ज दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा; पूरग्रस्तांना केली ५ कोटींची मदत, म्हणाला 'ही माझी...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Viral Video: पेट्रोल पंपावर महिलांचा राडा, आधी चप्पल फेकून मारली, नंतर जमिनीवर आपटलं!

SCROLL FOR NEXT