बिल्डरच्या अपहरण प्रकरणी ठाकरे सेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक.
मुख्य संशयित शंकर गोवर्धन वाडेकर पसार झाला आहे.
न्यायालयात नेण्याआधी पोलिसांनी आरोपींच्या तोंडून कायद्याचा बाल्लेकिल्ला असं वदवून घेतलं.
आडगाव शिवारातील बिल्डरचे अपहरण करून त्यांना धमकावण्या प्रकरणी पोलिसांनी ठाकरे सेनेच्या सावकार पदाधिकाऱ्यांला बेड्या ठोकल्या आहेत. नाशिक पोलिसांनी संशयित विशाल सुभाष कदम आणि त्याचा नातेवाईक अमित मधुकर पाटील याला अटक केल्या आहेत. इतकेच नाहीतर पोलिसांनी त्यांना 'नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला' बोलायवला लावलं. दरम्यान या प्रकरणातील शंकर गोवर्धन वाडेकर है संशयित पसार असून,पोलीस त्यांच्या मागावर आहेत. न्यायालयाने त्यांना २८ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावलीय.
शहरातील अनेक खासगी सावकार राजकीय पक्षांचे आधारस्तंभ बनलेत. पक्षाच्या पदाधिकान्याचा वाढदिवस, पक्षाचे कार्यक्रम असले की या सावकारांकडून आर्थिक रसद पुरविली जाते. त्यामुळे कार्यकर्ते असलेले सावकार मनमानी सावकारी करत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. ठाकरे सेनेतील पदाधिकारी देखील खासगी सावकारी करायचा. त्यातूनच त्याने बिल्डरचे अपहरण करून त्याला धमकावलं होतं.
सारीका विजय शिरोडे यांच्या फिर्यादीनुसार त्याचे पती विजय शिरोडे हे २०२० ते १९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पंचवटी व नाशिक शहरात बांधकाम व्यवसाय करायचे. त्यांनी व्यवसायानिमित्त विशाल कदम याच्याकडून काही रक्कम हातउसनवार घेतली होती. मात्र, या रकमेवर कदम वाने मनमानी व्याज वसूल केलं.
आरोपींनी शिरोडे यांचे वारंवार अपहरण करीत कागदपत्रांवर जबरीने त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. आरोपींनी शिरोडे यांचे वारंवार अपहरण करीत कागदपत्रांवर जबरीने त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. संशयित चौघेही शिरोडे यांच्यावर सतत अन्याय अत्याचार करत होते. कदम याने शिरोडे यांना मोबाईलवरुन धमकी दिली होती. याप्रकरणी दोघांविरुद्ध खासगी सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.