Tamil Nadu Crime  Saam
क्राईम

Tamil Nadu Crime: डोक्यात शिरलं प्रेमाचं भूत; इंजिनीअर मैत्रिणीसोबत लग्न करण्यासाठी लिंग बदललं; तिलाच साखळीने बांधून जिवंत जाळलं

Tamil Nadu Crime: एका व्यक्तीने आपल्या सॉप्टवेअर इंजिनिअर मैत्रिणीची हत्या केली. वाढदिवशी सरप्राईज गिप्ट देण्याच्या बहाण्याने मैत्रिणीचे डोळे बांधले त्यानंतर साखळीने बांधत तिला जिवंत जाळल्याची घटना चेन्नईत घडलीय.

Bharat Jadhav

Transmen killed His Friend Chennai Crime:

चेन्नईमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. एका व्यक्तीने आपल्या सॉप्टवेअर इंजिनिअर मैत्रिणीची हत्या केली. वाढदिवशी सरप्राईज गिप्ट देण्याच्या बहाण्याने मैत्रिणीचे डोळे बांधले त्यानंतर साखळीने बांधत तिला जिवंत जाळल्याची घटना चेन्नईत घडलीय. संशंयित आरोपीची ओळख पटवण्यात आली असून त्याचं नाव वेट्रिमारन आहे. आरोपी एक ट्रान्स पुरुष आहे. त्यानेच त्याची सॉफ्टवेअर मैत्रिणीला जिवंत जाळल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केलीय.(Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही एकमेंकांना ओळखत होते. विशेष म्हणजे काही काळ ते एकत्रही राहिले होते. सॉप्टवेअर इंजिनिअर असलेली २५ वर्षीय नंदिनी मदुराई येथील रहिवाशी होती. मदुराई येथील शाळेत आरोपी २६वर्षीय ट्रान्ससेक्शुअल पंडी माहेश्वरी आणि मृत नंदिनी शिकत होते. त्यानंतर हे दोघे एकाच कंपनीत काम करत होते. त्यावेळी हे दोघेही एकत्र राहत होते.

काही दिवसानंतर माहेश्वरीने लिंग बदललं आणि तिने स्वत:चं नाव वेट्रिमारन ठेवलं. त्यानंतरही नंदिनीने माणुसकीच्या नात्याने तिच्याशी मैत्री ठेवली. परंतु या वेट्रिमारनचं नंदिनीवर प्रेम जडलं होतं. वेट्रिमारनला नंदिनीशी लग्न करायचे होते, त्यासाठी तिने लिंग बदललं. पण ज्या मुलीसोबत लग्न करायचं होतं, त्याच मैत्रिणींची वेट्रिमारनने हत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपीचं नाव पंडी महेश्वरी (आधीची महिला ) लिंग बदल्यानंतर तिने तिचं नाव वेट्रिमारन ठेवलं होतं. शनिवारी चेन्नईच्या दक्षिणेकडील उपनगर केलंबक्कमजवळील थलंबूर येथे वेट्रिमारनने नंदिनीला तिच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी सरप्राईज गिप्ट देण्याच्या बहाणा केला. सरप्राईजसाठी त्याने नंदिनीच्या डोळ्यावर पट्टी बांधली, त्यानंतर तिला साखळीत बांधून आणि जिवंत जाळलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: 'मतचोरीच्या खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही',: मुख्य निवडणूक आयुक्त

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; नेमकं कारण काय?

Maharashtra Live News Update: पेशवे जयंतीनिमित्त रॅली मध्ये सहभाग घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी चालवली दुचाकी

Priya Bapat: प्रिया बापटचा स्पेशल बॉसी लूक; लवकरच झळकणार नव्या भूमिका

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तानी संघाची घोषणा, PCB चा बाबर आझम-मोहम्मद रिझवानला धक्का

SCROLL FOR NEXT