Solapur 20 Year old youth And 17 year Girl End life  google
क्राईम

Solapur Crime News: सोलापूर हादरलं! एकाच गावातील युवक-युवतीची एकाच दिवशी आत्महत्या

Solapur 20 Year old youth And 17 year Girl End life: बार्शीतील एकाच गावात एका युवक आणि अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. आत्महत्येच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडालीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विष्णूभूषण लिमये, साम प्रतिनिधी

सोलापूरातील बार्शी गावात एक धक्कादायक घटना घडलीय. एकाच गावातील युवक आणि अल्पवयीन युवतीने आत्महत्या केलीय. दोघांनी कोणत्या कारणाने जीवन यात्रा संपवलीय त्याचे कारण अद्याप समोर आले नाहीये. परंतु दोघांच्या आत्महत्येमुळे बार्शी गावात मोठी खळबळ माजलीय.

बार्शी तालुक्यातील पांढरी गावात राहणाऱ्या एका मुलाने आणि युवतीने आत्महत्या केलीय. आत्महत्या करणाऱ्या मुलाचं वय २० वर्ष असून त्याचे नाव समर्थ उर्फ बाळू दत्तात्रय लोंढे असे आहे, तर मुलीचं वय १७ वर्ष आहे. समर्थ लोंढे यांने एका शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तर अल्पवयीन मुलीने राहत्या घरी लोखंडी पाईपला गळफास घेत आयुष्य संपवलं. एकाच दिवशी दोघांनी आत्महत्या केल्यामुळे बार्शी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समर्थ उर्फ बाळू दत्तात्रय लोंढे याने गावातील एका शेतातील झाडाला गळफास घेतला. तर तेथून काही अंतरावर असलेल्या घरात लोखंडी पाईपाला गळफास लावून मुलीने आत्महत्या केली. या दोघांनी टोकाचे पाऊल कोणत्या कारणातून उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये.

एकाच गावात युवक आणि युवतीने आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडालीय. या घटनेची माहिती मिळताच पांगरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांना पाचरण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आणि पंचनामा केला. पोलिसांनी या दोन्ही घटनांची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आलीय. पोलीस या घटनेचा पोलीस सर्वअंगाने तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींना मिळणार नाही जुलैचा हप्ता; अपात्रतेचे निकष काय?

Maharashtra Live News Update : अजित पवार मुख्यमंत्री होई पर्यंत गप्प बसायचं नाही - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

Success Story: मालिकेतून प्रेरणा मिळाली, ६ नोकऱ्या सोडल्या, तिसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS संगीता कालिया यांचा प्रवास

Nishikant Dubey on Thackeray Brothers : ठाकरे बंधू संपणार, मुंबईत केवळ 30 टक्के मराठी; निशिकांत दुबे पुन्हा बरळले, VIDEO

Dhananjay Munde : मंत्रिपद गेलं, पण मुंडेंना सरकारी बंगल्याचा मोह सुटेना; बंगल्यापायी ठोठावला इतक्या लाखांचा दंड, VIDEO

SCROLL FOR NEXT