Solapur Barshi Crime News Saam Tv
क्राईम

Shocking : सोलापुरात सैराट! बहिणीबरोबर प्रेमविवाह केल्याने भाऊ संतापला, हॉटेलवर जेवायला बोलवून काटा काढला

Solapur Barshi Crime News : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे प्रेमविवाहाला विरोध केल्याच्या रागातून मेहुण्याने भाऊजीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी फरार असून पोलीस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • सोलापुरातील बार्शीत हत्याकांड

  • प्रेमविवाहाच्या वादातून मेहुण्याने केली भाऊजीची हत्या

  • हॉटेलमध्ये झालेल्या भांडणानंतर बाटलीने प्राणघातक हल्ला

  • आरोपी फरार, पोलीस शोध सुरू

विश्वभूषण लिमये, सोलापूर

सोलापुरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील बार्शी येथे मेहुण्याने भाऊजीची धारदार शस्त्राने हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे प्रेम विवाहाला विरोध केल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे. शिअवय या घटनेतील आरोपी ऋषिकेश क्षीरसागर हा अद्याप फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुशील क्षीरसागर आणि ऋषिकेश याची बहीण रेश्मा हिचा प्रेमविवाह एक वर्षांपूर्वी झाला होता. घरातील काही सदस्यांना हे लग्न मान्य नव्हत. सुशील आणि रेश्मा कामानिमित्ताने पुणे येथे स्थायिक झाले होते. त्यानंतर २३ जानेवारी रोजी कार्यक्रम असल्यामुळे सुशील आणि रेश्मा हे येरमाळा येथे आले होते.

बुधवारी २८ जानेवारी रोजी बार्शीतील पांगरी येथील एका हॉटेलच्या रूमवर, सायंकाळी साडेआठच्या सुमारास सुशील, रेश्मा आणि ऋषिकेश यांच्यासह घरातील मंडळी जेवणासाठी एका हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळेस सुशील आणि ऋषिकेश यांचं कडाक्याचं भांडण झालं आणि त्यातून ऋषिकेशने सुशीलच्या डोक्यात बाटली फोडून वार करत ठार केलं.

सुशील गंभीररीत्या जखमी झाल्याने कुटुंबीयांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वी सुशील याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेनंतर आरोपी ऋषिकेश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत असून आरोपीला अद्यापही अटक झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सोने खरेदीदारांच्या खिशाला कात्री, सलग चौथ्या दिवशी दरवाढ; आजचा ताजा भाव काय?

Maharashtra News Live Update: कृषी शिक्षणात महाराष्ट्र पडला मागे... राष्ट्रीय मानांकन यादीतून राहुरी कृषी विद्यापीठ ' आऊट '

Paper Leak: मोदींची 'फास्ट ट्रॅक कोर्ट'ची घोषणा, राहुल गांधींचा पलटवार; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासह केल्या 'या' ३ मोठ्या मागण्या

ITR Filing 2026: 31 जुलैपर्यंत ITR भरला नाही तर मोठा आर्थिक फटका; प्रत्येक करदात्याने ही बातमी एकदा वाचाच

Bollywood Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध अभिनेत्री चढली बोहल्यावर; नवऱ्यासाठी केली खास पोस्ट, पाहा लग्नाचे PHOTOS

SCROLL FOR NEXT