Sangali News Saam Tv
क्राईम

Reel Stunt Alert : रिलस्टारला खाकीचा दणका! बाईकवर स्टंटबाजी करणं आलं अंगलट, २२ हजारांचा दंड वसूल

Sangali News : रिल बनवण्याच्या नादात सांगलीतील एका तरुणाला स्टंटबाजी अंगलट आली. वाहतूक पोलिसांनी धोकादायक वाहनचालकावर कारवाई करत २२ हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, तरुणाचे वाहन ताब्यात घेतले आहे.

Alisha Khedekar

  • सांगलीतील तरुणाने धोकादायकरीत्या वाहन चालवत रील शूट केल्याचा प्रकार समोर आला आहे

  • वाहतूक पोलिसांनी संबंधित तरुणाकडून २२ हजार रुपयांचा दंड आकारला आहे

  • वाहन ताब्यात घेऊन पोलिसांनी अधिनियमांनुसार कारवाई केली आहे

  • रस्त्यावर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाईला पोलिसांचा कडक इशारा देण्यात आला

रिलबाजीच्या नादात तरुणाई वाहवत चालल्याचं प्रमाण वाढलं आहे. लाईक आणि व्ह्यूजच्या नादात अनेकदा हानी पोहचेल अशा ठिकाणी तरुण मंडळी रिल्स बनवतं असल्याचं आढळून येत. अशाच एका सांगलीतील तरुणाला त्याची स्टंटबाजी अंगलट आली आहे. धोकादायकरीत्या वाहन चालवत या तरुणाने रिल्स बनवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी या तरुणाला चांगलीच अद्दल घडवली आहे. आणि त्याच्याकडून २२ हजाराचा दंड वसूल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगली शहरात एक तरुण हा धोकादायक रित्या सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर वाहन चालवून स्टंटबाजी करत होता. वाहतूक पोलिसांच्या हे लक्षात येताच त्यांनी धडक कारवाई केली आहे. माहितीच्या अनुषंगाने मॉनिटरिंग सील कडून अधिकची माहिती प्राप्त करून घेऊन संबंधित स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचे वाहन ताब्यात घेण्यात आले आहे.

शिवाय या तरुणावर अधिनियम अंतर्गत विरुद्ध कारवाई करत त्याच्या कडून २२ हजार रुपये दंड रोख स्वरूपात वसूल केला आहे. सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी केलेली आहे.

दरम्यान अशा पद्धतीची स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाईला चाप बसावा यासाठी पोलिसांचं बारीक लक्ष असणार आहे. तसेच अशा प्रकारे स्टंटबाजी करताना आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

Accident: लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १०० जणांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला कंटेनरची धडक; ४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT