Sindhudurg Malvan Forest Skeleton Found Saam Tv News
क्राईम

Sindhudurg Crime : सिंधुदुर्गच्या जंगलात तरुणाचा सांगाडा, घड्याळ, बॅग अन् मोबाईलमुळे सख्ख्या भावाने ओळखलं

Sindhudurg Malvan Forest Skeleton Found : पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूरच्या युवकाचा सिंधुदुर्गमधील आंबोली घाटातील दरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मालवण जंगलातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Prashant Patil

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी एका जंगलात विदेशी पर्यटक महिलेचा जिवंतपणे बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोनुर्ली रोणापाल येथील घनदाट जंगलात एक मूळ अमेरिकन महिलेला साखळदंडांनी बांधून ठेवण्यात आलं होतं. या महिलेला सिंधुदुर्गमधून रत्नागिरी येथे उपचारासाठी हलविण्यात आलं होतं. उपचारादरम्यान ती महिला प्रथमदर्शी मानसिक रुग्ण असल्याचं समोर आलं होतं. आता, पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका जंगलात नेपाळी तरुणाच मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूरच्या युवकाचा सिंधुदुर्गमधील आंबोली घाटातील दरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मालवण जंगलातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालवण तालुक्यातील नांदोस गावातील जंगलमय भागात पुरुष जातीचा सडलेल्या अवस्थेतील सांगाडा सापडल्यानं खळबळ उडाली आहे. या सांगाड्यासोबत घड्याळ, बॅग आणि मोबाईल देखील सापडला आहे. त्यावरून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर सांगाडा हा कट्टा येथील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या नेपाळी तरुणाचा असून याबाबत त्याच्या भावाने त्या ठिकाणी सापडलेल्या साहित्याची ओळख पटविली आहे. या प्रकरणी, मालवण पोलीस अधिक करीत आहेत.

मालवण जंगलात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील नांदोस गावातील जंगलमय भागात पुरुष जातीचा सडलेल्या अवस्थेतील सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली आहे. या सांगाड्यासोबत घड्याळ, बॅग आणि मोबाईल देखील सापडला आहे. त्यावरून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर सांगाडा हा कट्टा येथील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या नेपाळी तरुणाचा असून याबाबत त्याच्या भावाने त्या ठिकाणी सापडलेल्या साहित्याची ओळख पटविली आहे. या प्रकरणी, मालवण पोलीस अधिक करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

आताच तिकिट बुक करा! दिवळीआधी रेल्वेचं मोठं गिफ्ट, तब्बल ९४४ विशेष गाड्या धावणार, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT