क्राईम

Crime News: अहिल्यानगरमध्येही मस्साजोगसारखा प्रकार, गटाराच्या चेंबरमध्ये कोंबून तरुणाची हत्या; मारहाण करताना बनवला व्हिडिओ

Ahilyanagar Crime: मस्साजोग प्रकरणानंतर अहिल्यानगरमध्ये दोन तरुणांना गटाराच्या चेंबरमध्ये ठेऊन अमानुष मारहाण झाली. यात एकाचा मृत्यू झाला आणि मृतदेह डोंगरात जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली.

Dhanshri Shintre

बीडमधील मस्साजोग प्रकरण ताजं असतानाच आता अहिल्यानगरमध्ये दोन तरुणांना गटाराच्या चेंबरमध्ये ठेऊन अमानुष मारहाण केली गेली. यात एका तरुणाचा मृत्यू झाला आणि त्याचा मृतदेह डोंगरावर नेऊन जाळण्यात आला. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई सुरू असून तपासाची प्रक्रिया चालू आहे.

वैभव ऊर्फ सोन्या नायकोडी (१९, रा. ढवणवस्ती, अहिल्यानगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता त्याचे अपहरण करण्यात आले होते. यापूर्वी २१ फेब्रुवारी रोजी आरोपींनी संदेश भागाजी वाळूंज ऊर्फ गोट्या (१९, रा. नवनागापूर, एमआयडीसी) याचेही अपहरण केले होते. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपींच्या शोधासाठी विविध पद्धतींनी कारवाई सुरू आहे. घटनांची धक्कादायकता पाहता, स्थानिक पोलिस यंत्रणांमध्ये चांगलीच हलचल आहे.

संदेशला त्याच्या घरातून बोलावून एका कारमध्ये घालून त्याची बेदम मारहाण केली गेली. त्यानंतर त्याला एका निर्जनस्थळी घेऊन गटारीच्या चेंबरमध्ये कोंबून मारहाण करण्यात आली. आरोपींनी या मारहाणीचा व्हिडीओ काढला आणि संदेशला नागापूरमधील एका फ्लॅटमध्ये रात्रभर बंदी ठेवले. दुसऱ्या दिवशी २२ फेब्रुवारीला संदेशच्या मोबाइलवर वैभव नायकोडीचा मेसेज आल्यावर, आरोपींनी संदेशला त्याला फोन करून वैभवला बोलवण्यास सांगितले. संदेशने फोन करून वैभवला तपोवन रोडवरील एका रुग्णालयाजवळ बोलवले.

आरोपींनी संदेशच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला वैभव ज्या सलूनमध्ये थांबला होता, तिथे नेले. तिथे नायकोडीची ओळख पटवून त्यांना पुन्हा निर्जनस्थळी घेऊन जाऊन गटारीच्या चेंबरमध्ये कोंबून मारहाण केली. रात्री त्यांना फ्लॅटमध्ये डांबले आणि मॅगी खायला दिली. संदेशने मॅगी खाल्ली पण वैभवने नकार दिला. ज्यामुळे त्याला पुन्हा मारहाण केली. दुसऱ्या दिवशी पहाटे वैभवला उठविण्याचा प्रयत्न केला पण तो उठत नव्हता. तो मयत झाल्याचे लक्षात येताच, आरोपींनी त्याचा मृतदेह मनमाड रोडवरील केकताई डोंगरात जाऊन जाळला. त्यानंतर आरोपींनी संदेशाला धमकी देऊन सोडले. वैभवच्या खुनाची घटना उघड झाल्यानंतर संदेश पोलिसांकडे गेला आणि सर्व हकीकत सांगितली.

तरुणांच्या दोन टोळ्यांमध्ये वाद असल्याचे समोर आले आहे. १९ जानेवारीला आरोपी अनिकेत सोमवंशीवर एका अल्पवयीन मुलासोबत इतर पाच जणांनी कोयत्याने वार केले होते. मयत वैभव नायकोडी आणि संदेश हे त्या टोळीसोबत होते, ज्यामुळे रागाच्या कारणावरून त्यांचे अपहरण करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT