SHOCKING MORBI CASE! HUSBAND, LANDLORD ARRESTED IN WOMAN AND MINOR ABUSE CASE saam tv
क्राईम

Shocking: २ हजार रुपयांच्या भाड्यासाठी मालकाकडे सोपवली बायको अन् पोरगी; दोघींवर घर मालकाकडून वारंवार अत्याचार

Gujarat Crime News: घरभाड्याच्या बदल्यात एका व्यक्तीने पत्नी आणि मुलीला घरमालकाकडे पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पती आणि घर मालकाला अटक करण्यात आली आहे.

Bharat Jadhav

  • गुजरातच्या मोरबीमध्ये संतापजनक प्रकार उघड.

  • घरभाड्याच्या बदल्यात पत्नी आणि मुलीवर अत्याचाराचा आरोप.

  • पती आणि घरमालकाला पोलिसांनी अटक केली.

गुजरातमधील मोरबी भागात एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका व्यक्तीने घर भाड्याच्या बदल्यात मालकाकडे आपली पत्नी आणि मुलगी सोपवली. घर मालक हा या व्यक्तीचा नातेवाईक असून त्याने मुलगी आणि भाडोत्री महिलेवर वारंवार अत्याचार केला. घर भाडे द्यावे लागू नये म्हणून भाडोत्री व्यक्ती आपली बायको आणि आणि मुलगीला घर मालकाकडे पाठवत असायचा.

हा संतापजनक प्रकार पत्नीच्या आईने तक्रार केल्यानंतर समोर आला. पीडित महिलेच्या आईने जावई, घरमालक आणि एका नातेवाईकाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पती आणि घरमालकाला अटक केली असून, एक नातेवाईक अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पीडित आणि आरोपींच्या वैद्यकीय चाचण्या केल्या. काही वैज्ञानिक पुरावेही गोळा करण्यात आले आहेत. घरमालक आणि गुन्ह्यात मदत करणाऱ्या नातेवाईकाचे कुटुंबीय फरार झाले आहे.

नवऱ्यानं स्वत:च्या पत्नीवर करायला लावला अत्याचार

पीडितेच्या आई आणि आजीने त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचे कुटुंब सहा महिन्यांपूर्वी कामासाठी मोरबीला स्थलांतरित झाले होते. पतीने तिथे २,००० रुपयांना एक घर भाड्याने घेतले होते. त्याचे काम चांगले चालत नव्हते, त्यामुळे तो वेळेवर भाडे देऊ शकला नाही. यामुळे भाडे हळूहळू वाढत गेले. परिणामी पतीने आपल्या पत्नी आणि १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यास संमती दिली.

घटनेच्या वेळी ती मुलगी १३ वर्षे आणि ७ महिन्यांची होती. घरमालकाने स्वतःच्याच घरात त्यांच्यावर वारंवार बलात्कार केला. दरम्यान ५५ वर्षीय आरोपी मालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tap Cleaning Tips: स्टीलच्या नळांवरील डाग काढण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; वापरा 'या' घरगुती टिप्स

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपके पुन्हा दिल्लीमधील आंदोलनात सहभागी होणार

Political News : दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी, महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

OTT Releases : 'या' आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल? नव्या चित्रपटांसह वेब सीरिज अन् रिॲलिटी शोची मेजवानी!

SCROLL FOR NEXT