Police investigate a shocking violent attack linked to a love affair in a sugarcane field in Uttar Pradesh. saam tv
क्राईम

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Woman Attacks Lover After Marriage In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील हरदोई येथे प्रेमप्रकरणातून एक धक्कादायक घटना घडली. प्रियकराने लग्न केल्याच्या रागातून महिलेने ऊसाच्या शेतात बोलावून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला.

Omkar Sonawane

उत्तर प्रदेशातील हरदोईमध्ये प्रेमप्रकरणातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रियकराचे लग्न झाल्याने संतापलेल्या प्रेयसीने त्याला ऊसाच्या शेतात भेटायला बोलावलं आणि रागाच्या भरात त्याचं गुप्तांग कापलं. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुधीर याचं 6 मे रोजी लग्न झालं होतं. सुधीरचे त्याच्याच भावाच्या बायकोसोबत 4 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सुधीरने लग्न केल्यामुळे आरती त्याच्यावर प्रचंड नाराज होती.

ऊसाच्या शेताने बोलावून वार

आरतीने सुधीरला चर्चेच्या बहाण्याने गावाबाहेर असलेल्या एका ऊसाच्या शेतात बोलावलं. तिथं दोघांमध्ये जोरदार वाद झाले. याचा वादातून रागाच्या भरात आरतीने धारदार ब्लेडनं सुधीरच्या गुप्तांगावर वार करून ते कापलं. घटनेनंतर सुधीर रक्ताच्या थारोळ्यात तिथेच कोसळला. त्याचा आरडाओरडा ऐकून त्याचा मित्र तिथे पोहोचला आणि त्याला तातडीने समुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सुधीरची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात हलवलं आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवली आणि आगमपूर तिराहून आरोपी आरतीला ताब्यात घेतले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT