Uttar Pradesh Crime Saam Tv
क्राईम

Crime: हाताची बोटं छाटली, पोट फाडलं; लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला करत...

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये मेडिकलच्या मालकाने तरुणावर जीवघेणा हल्ला केला. तरुणावर चाकूने हल्ला करत पोट फाडलं त्याचसोबत त्याची बोट झाटली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Priya More

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये हल्ल्याची भयंकर घटना घडली. कानपूरच्या रावतपूरमध्ये एका लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. किरकोळ वादानंतर मेडिकल स्टोअरच्या मालकाने लॉच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याचा अमानुष छळ करत हल्ला केला. धारधार शस्त्राने वार करत आधी विद्यार्थ्याची बोटं छाटली त्यानंतर त्याचे पोट फाडले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शाहूजी महाराज युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी एलएलबीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. अभिजीत सिंह चंदेल असे हल्ला झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. हा विद्यार्थी मेडिकलमध्ये औषध खरेदी करण्यासाठी गेला होता. त्यावेळी औषधाच्या किमतीवरून त्याचा मेडिकल मालकासोबत वाद झाला. त्यानंतर मेडिकल मालाकाने त्याच्यावर हल्ला केला.

हल्ल्यादरम्यान विद्यार्थ्याचा किंचाळण्याचा आवाज ऐकून मदतीसाठी काही नागरिक धावून आले. आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. जखमी झालेल्या विद्यार्थ्याला नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस याप्रकरणाचा तपास करत असून या प्रकरणी त्यांनी तिघांना अटक केली.

पोलिसांनी सांगितले की, अभिजीत शनिवारी रात्री ९ वाजता केशवपुरम येथील घराजवळ असणाऱ्या मेडिकलमध्ये औषध खरेदी करण्यासाठी गेला होता. त्याठिकाणी औषधच्या किमतीवरून त्याचे मेडिकल मालकाशी भांडण झाले. मेडिकलच्या मालकाने आपल्या दोन भावांना बोलावून घेतलं. या सर्वांनी एकत्रित येत अभिजीतवर जीवघेणा हल्ला केला. आरोपीने अभिजीतच्या डोक्यावर आणि पोटावर चाकूने वार केले. त्याचसोबत त्याची बोटं देखील कापली. या हल्लयानंतर जखमी झालेल्या अभिजीतला रुग्णालयात दाखल करण्यात आले. २ तास त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्याची प्रकृती स्थिर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : जुनाट विकार डोके वर काढणार; ५ राशींच्या लोकांना घ्यावी लागेल तब्येतीची काळजी

मुंढवा जमीन प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य आरोपींमधील आणखी एकाला अटक

Indigo Chaos Hits Maharashtra: इंडिगोचा घोळ, मंत्री-आमदारांना फटका, नागपुरात जाण्यासाठी नेत्यांची धावपळ

Maharashtra Live News Update: माजी खासदार नवनीत राणा यांचं पुन्हा बाबरीची वीट रचणाऱ्यांना ट्विट करून दिले आव्हान

Diabetes Fruits Care: डायबेटीजच्या रुग्णांनी कोणती फळं खावीत? तज्ञांनी सांगितली यादी, एकदा वाचाच

SCROLL FOR NEXT