Latest crime news from Karjat Raigad district body recovered saam tv
क्राईम

Karjat crime : कर्जतमधील बैलगाडा शर्यत मैदानावर आढळला तरुणाचा मृतदेह; हत्येनंतर चेहऱ्यावर टाकलं अॅसिड

Latest crime news from Karjat : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात एका ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करून ओळख लपवण्यासाठी त्याच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकल्याची धक्कादायक नेवाळी गावातील बैलगाडी शर्यतीच्या मैदानावर घटना घडली आहे.

Saam Tv

सचिन कदम

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात एका ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ओळख लपवण्याच्या उद्देशाने मारेकऱ्यांनी तरुणाच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकून तो विद्रूप केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कर्जत तालुक्यातील नेवाळी गावातील बैलगाडी शर्यतीच्या मैदानावर या तरुणाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत तरुणाचे नाव रोहित संजय ढोले ( ३०) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित नेवाळी गावात एका हळदी समारंभासाठी आला होता. रात्रीच्या सुमारास त्याला कोणाचा तरी फोन आला. त्यानंतर तो घरातून बाहेर पडला. मात्र, रात्र उलटून पहाट झाली तरी तो घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना चिंता वाटू लागली आणि त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

दरम्यान, सकाळी नेवाळी येथील बैलगाडी शर्यतीच्या मैदानावर रोहितचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या गंभीर खुणा होत्या. तसेच चेहऱ्यावर ॲसिड टाकून तो विद्रूप करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रोहितची हत्या करून त्याची ओळख लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रोहितला रात्री नेमका कोणाचा फोन आला होता, तो घराबाहेर कोणाला भेटण्यासाठी गेला होता का आणि या हत्येमागे कोणते कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, हत्येमागील नेमके कारण आणि घटनाक्रम तपासाअंती स्पष्ट होणार आहे. या निर्घृण हत्येमुळे कर्जत परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : नात्याला काळिमा! मध्यरात्री सख्ख्या भावानेच काढला भावाचा काटा; धक्कादायक कारण आलं समोर

Pune Crime: २ तरुणांना नग्न करून दिला करंट, आठ दिवस डांबून ठेवत मारहाण करून बियरच्या बॉटलवर बसवले

Breaking News : मोठी बातमी! शरद पवार सत्तेत कधी सहभागी होणार? शिवसेनेच्या बड्या नेत्यानं थेट तारीख सांगितली

Maharashtra News Live Update: उद्या सकाळी १० वाजता सुप्रिया सुळे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शरद पवार पक्षाची बैठक

चहलनंतर आणखी एका क्रिकेटरची राजकारणात एण्ट्री होणार? भाजप अध्यक्षांसोबतचा फोटो व्हायरल,चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT