Kalyan Crime saam Tv
क्राईम

Kalyan Crime: कल्याणमधील धक्कादायक घटना; क्षुल्लक वादातून मारहाण, एका इसमाचा मृत्यू

Crime News: कल्याण पूर्वेकडील नेतीवली येथील गणेश नगर परिसरात सुरज सोमा इलम हा तरुण राहत होता. आज दुपारच्या सुमारास सुरज याचा काही तरुणांसोबत याच परिसरात वाद झाला. या वादातून एका तरुणाला दोन ते तीन लोकांनी मारहाण केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(अभिजित देशमुख)

Kalyan Crime News:

कल्याण पूर्व नेतीवली गणेश नगर परिसरात किरोकोळ वादातून एका तरुणाला ३ ते ४ जणांनी लाकडी फळीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. सूरज सोमा ईलम असे मयत तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच कोळशेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुरज याचा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. कोळशेवाडी पोलिसांनी याप्रकरणी हत्येचाचा गुन्हा दाखल करत हल्लेखोरांचा शोध सुरू केलाय.(Latest News)

कल्याण पूर्वेकडील नेतीवली येथील गणेश नगर परिसरात सुरज सोमा इलम हा तरुण राहत होता. आज दुपारच्या सुमारास सुरज याचा काही तरुणांसोबत याच परिसरात वाद झाला. २ते ३ तरुणांनी सुरज याला लाकडी फळीने मारहाण केली. त्यानंतर मारहाण करणारे तरुण तिथून पसार झाले. या तरुणांनी केलेल्या मारहाणीत सुरजचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच कोळशेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले सुरजचा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलाय. याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत हल्लेखोरांचा शोध सुरू केलाय. या तरुणांमध्ये काय वाद होता, हल्ला कोणत्या कारणावरून झाला याचा शोध देखील पोलीस घेत आहेत.

पिस्तूल बाळगणारा गुन्हेगार गजाआड

बेकायदेशीरित्या विनापरवाना विदेशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राम उर्फ शिवा कनोजिया असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली पोलीस सर्तक झाले आहेत. मानपाडा पोलिसांना डोंबिवली पूर्वेकडील टाटानगर परिसरात एक इसम बेकायदेशीररित्या विनापरवाना पिस्तूल बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic: मतदानाच्या दिवशी मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या...

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT