बीडमध्ये मुलाने आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडच्या धारूर तालुक्यातील तरनळी गावात ही घटना घडली. मुलाने जन्मदात्या आईला लोखंडी पाईपच्या सहाय्याने बेदम मारहाण केली. डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुवर्णमाला बांगर असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. त्या आपल्या घरासमोर बसल्या असताना त्यांचा मुलगा दत्ता बांगरने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. घरात जाऊन त्याने लोखंडी पाईप आणला आणि आईला मारहाण करत डोक्यावरही हल्ला केला. मारहाण करताना दत्ताचा लहान मुलगा तिथेच होता. मुलासमोरच त्याने आपल्या आईला संपवलं. यावेळी त्यांच्या बाजूला असलेल्या भावजाईला देखील दत्ता बांगरने जीवे मारण्याची धमकी दिली.
रक्तबंबाळ झालेल्या सुर्णमाला बांगर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना अंबाजोगाई येथील स्वादाती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात दत्ता बांगर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.