Crime News Saam Tv
क्राईम

Shocking : चोरीच्या आरोपाखाली गावगुंडांकडून क्रूर शिक्षा, दोन दिवस तरुणाच्या गुप्तांगात...

Bihar Crime : बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात चोरीच्या आरोपाखाली एका तरुणाला पकडून अमानुष मारहाण करण्यात आली. त्याच्या गुदद्वारात पेट्रोल ओतण्यात आले असून तो सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात चोरीच्या आरोपावरून तरुणावर अमानुष अत्याचार.

  • आरोपींनी पीडिताच्या गुदद्वारात पेट्रोल ओतले आणि दोन दिवस दबावाखाली ठेवले.

  • कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी पीडिताला सोडवून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

  • पोलिसांकडे तक्रार दाखल.

बिहार मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात चोरीच्या आरोपाखाली एका तरुणाला पकडून मारहाण करण्यात आली आणि त्याच्या गुदद्वारात पेट्रोल ओतण्यात आले. या प्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.

बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील झंडापूर पोलीस स्टेशन हद्दीतील दयालपूर गावात चोरीच्या आरोपाखाली एका तरुणाला पकडून मारहाण करण्यात आली. तरुणाने गुन्हा कबुल न केल्याने त्याच्या गुदद्वारात पेट्रोल ओतण्यात आले. आरोपीने पीडित तरुणाला दोन दिवस दबावाखाली ठेवल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

पीडितेच्या कुटुंबीयांनी स्थानिक लोकांच्या मदतीने मंगळवारी पीडित मुलाला नराधमांच्या तावडीतून सोडवले आणि प्रथम त्याला उपचारासाठी बिहपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, तेथून त्याला चांगल्या उपचारांसाठी मायागंज येथे पाठवण्यात आले. मंगळवारी संध्याकाळी उशिरा त्याला उपचारासाठी मायागंज येथे दाखल करण्यात आले.

पीडितेच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की ज्या घरात चोरी झाली त्या घरात सीसीटीव्ही बसवलेले आहेत. धक्कदायक म्हणजे ज्या घरातून चोरी झाली त्या घरातील फुटेजमध्ये त्यांचा पुतण्या चोरीत सहभागी असल्याचे दिसून आले. या घटनेबाबत पीडित तरुणाच्या पालकांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान या घटनेचा पोलीस अधिक तपास करत असून आरोपींचा शोध सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Land Scam: १८०० कोटींच्या जमीन घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई, ३ जणांविरोधात गुन्हा

Shocking News : धक्कदायक! वर्क लोड आला म्हणून नर्सने केली १० रुग्णांची हत्या, नेमकं काय प्रकरण?

Farsan Bhaji Recipe: रोज रोज बटाट्याची भाजी खाऊन कंटाळलात? मग झणझणीत फरसाणची रस्सा भाजी खाऊन पाहाच

Pune Land Scam: मोठी बातमी! पुण्यात आणखी एक जमीन घोटाळा, तहसीलदारांसह ९ जणांविरोधात गुन्हा

Maharashtra Live News Update: खगोलशास्त्रातील आणखी एक तारा हरपला

SCROLL FOR NEXT