चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर हल्ला केला.
भररस्त्यात नाक कापून महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली.
पोलिसांनी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केले.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. चारित्र्यावर संशय आल्यानंतर एका व्यक्तीनं भरस्त्यात आपल्या पत्नीचं नाक कापलं. त्यानंतर आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तो तेथून पळू गेला. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमी महिलेला रुग्णालयात पाठवले आणि तिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.
ग्वाल्हेर शहरातील पोलीस स्टेशन परिसरातील हॉटेल फ्लिनसमोर एका महिलेसोबत तिच्या नवऱ्यानं धक्कादायक कृत्य केलं. त्याने तिचा रस्ता अडवला, शिवीगाळ केली आणि नंतर तिचे नाक कापले. घटनेनंतर आरोपीने धमकी देऊन घटनास्थळावरून पळ काढला.
घटनास्थळी पोलीस पोहोचले. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. त्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. पीडितेचे म्हणणे आहे की, आरोपी पतीला तिच्या चारित्र्यावर संशय होता आणि दोघेही काही काळापासून वेगळे राहत होते.
या घटनेप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ग्वाल्हेर पोलिस स्टेशन परिसरातील रामतापुरा येथी ही महिला असून ती तिच्या पतीपासून विभक्त झालीय. चार शहर नाका येथे भाड्याच्या खोलीत राहतेय. घटनेच्या दिवशी ही महिला काही कामासाठी तानसेन नगरमधील लक्ष्मी डेअरी येथे जात होती.
हॉटेल फ्लिनसमोर ती येताच तिचा नवऱ्याने तिचा पाठलाग केला. तो त्याच्या पत्नीला शिवीगाळ करू लागला. तिने प्रतिकार केला तेव्हा त्याने तिच्या मानेला पकडलं आणि चाकूने तिच्या नाकावर वार करत नाक कापले.
घटनेनंतर आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तेथून पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला रुग्णालयात दाखल केलं. जखमी महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचा नवरा तिच्या चारित्र्यावर संशय घेत असायचा. तो दररोज त्यावरून तिच्याशी वाद घालत असायचा. रोजच्या वादाला कंटाळून ती तिच्या मुलीसह घर सोडून वेगळी राहू लागली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.