Sambhajinagar News Saam Tv
क्राईम

Shocking Crime News : संभाजीनगर हादरले! लग्नाला नकार दिल्यामुळे प्रियकराची निर्घृण हत्या; सीसीटीव्हीमुळे आरोपींचा पर्दाफाश

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये लग्नाला नकार दिल्यामुळे प्रेयसीने मामेभावाच्या मदतीने प्रियकराची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसीला आणि तिच्या मामेभावाला बेड्या ठोकल्या असून अद्याप एक आरोपी फरार आहे.

Alisha Khedekar

  • हर्सूलमधून बेपत्ता झालेल्या सचिन औताडेचा प्रेमसंबंधातून गळा चिरून खून.

  • मृतदेह गोदावरी नदीत फेकून दिल्यानंतर मुंगी गावाजवळ सापडला.

  • प्रेयसी भारती दुबे व मामेभाऊ दुर्गेश तिवारी अटकेत; अफरोज खान फरार.

  • लग्नाला नकार दिल्याने घडली धक्कादायक हत्या, परिसरात खळबळ.

छत्रपती संभाजीनगरमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. हर्सूल परिसरातून बेपत्ता झालेला सचिन पुंडलिक औताडे (३२) याचा प्रेमसंबंधातून गळा चिरून हत्या झाल्याचे समोर आले आहे. लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीला नकार दिल्याने ही हत्या घडवून आणल्याचे तपासात स्पष्ट झाले.याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे तर अद्याप एक आरोपी फरार आहे.

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार ३१ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता सचिन औताडे घरातून काहीही न सांगता दुचाकी घेऊन बाहेर पडला होता. त्यानंतर तो परतलाच नाही. नातेवाईकांनी व कुटुंबीयांनी शोधाशोध केली, मात्र काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे हर्सूल पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती.

कसा सापडला सचिनचा मृतदेह ?

याच दरम्यान १३ ऑगस्ट रोजी शेवगाव तालुक्यातील मुंगी येथे शेतकरी सदाशिव राजेभोसले यांच्या शेताजवळ गोदावरी नदीच्या पात्रात एक मृतदेह आढळला. त्यावरून शेवगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली होती. तपासादरम्यान मृताच्या उजव्या हातावर "सचिन" असे मराठीत कोरलेले आणि मानेवर "भारती" असे इंग्रजीत कोरलेले आढळून आले. त्यामुळे हा मृतदेह हरविलेल्या सचिन औताडे याचाच असल्याचे स्पष्ट झाले.

आरोपींना बेड्या

पोलिसांनी तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपी मृतदेह घेऊन जाताना त्यात कैद झाल्याचे समोर आले. यावरून पोलिसांनी संशयितांचा मागोवा घेतला. अखेर ते बुलढाणा जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी दुर्गेश तिवारी आणि भारती दुबे यांना अटक केली. प्राथमिक चौकशीत त्यांनीच खून केल्याची कबुली दिली आहे.

कशी झाली हत्या ?

आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार, ३१ जुलैला सचिन व भारती कॅनॉटमधील तिच्या फ्लॅटवर थांबले असताना त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी भारतीने मामेभाऊ दुर्गेश तिवारीला बोलावले. दारूच्या नशेत झालेल्या या वादात दुर्गेशने चाकूने सचिनचा गळा चिरून हत्या केली. त्यानंतर मृतदेह अफरोज खानच्या मदतीने गाडीतून नेऊन पैठणजवळ नदीत टाकण्यात आले.

पोलिस तपासात काय समोर आलं ?

अहिल्यानगर पोलिसांच्या माहितीनुसार,या प्रकरणातील मुख्य कारण प्रेमसंबंध आणि त्यातील तणाव समोर आले आहेत. भारती दुबे ही स्थानिक छावा संघटनेची महिला पदाधिकारी असून, सचिन औताडे हा देखील त्याच संघटनेत काम करीत होता. दोघांचे परस्पर प्रेमसंबंध असूनही सचिन विवाहित असल्याने त्याने भारतीशी लग्न करण्यास नकार दिला होता. त्यातूनच हा वाद निर्माण झाला. कुटुंबीयांकडूनही या नात्याला विरोध होता. या सर्व पार्श्वभूमीवर भारतीने मामेभावाच्या मदतीने सचिनचा काटा काढला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

SCROLL FOR NEXT