Shocking Crime In Prayagraj saamtv
क्राईम

Crime News: भयंकर! तांत्रिकानं आजोबाचं डोकं फिरवलं; चार दिशेला फेकले नातवाच्या शरीराचे तुकडे

Shocking Crime In Prayagraj: एका व्यक्तीने ग्रहदोषाचे निवारण करण्यासाठी आपल्या ११ वर्षांच्या नातवाची हत्या केली. नातवाच्या शरीराचे तुकडे त्याने वेगवेगळ्या दिशेला फेकले होते.

Bharat Jadhav

  • प्रयागराजमध्ये अंधश्रद्धेमुळे आजोबांनी नातवाचा खून केल्याची घटना उघड.

  • ११ वर्षाच्या मुलाचे शरीराचे तुकडे प्लास्टिकच्या पिशवीत सापडले.

  • पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून आरोपीला अटक केली.

प्रयागराज शहरात एक धक्कादायक बाब उघडकीस आलीय. अंधश्रद्धेपायी एका व्यक्तीने आपल्या नातवाचा नरबळी दिल्याची घटना उघकीस आलीय. काही दिवसापूर्वी प्रयागराज शहरातील औद्योगिक परिसरात शीर आणि हातपाय नसलेला मृतदेह सापडला होता. याप्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केलाय. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे. एका प्लास्टिकच्या पिशवीत सापडलेला मृतदेह हा पीयूष नावाच्या मुलाचा आहे. तो ११ वर्षाचा होता. पीयूष करेलीच्या सादियापूर येथे राहणारा होता.

५० हून अधिक सीसीटीव्ही तपासले

दरम्यान पोलिसांनी या हत्येप्रकरणी त्या मुलाच्या आजोबा अटक केलीय. त्याच्या जबाबनंतर पोलिसांनी मृतदेहाचे इतर तुकडे जप्त केली आहेत. आरोपीने कुरिया गावाजवळील औद्योगिक परिसरात पॉलिथीनच्या पिशवीत छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह टाकला होता. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळाचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले.

मिर्जापूर रोडवरील ५० हून अधिक कॅमेरे तपासले असता स्कूटीवर जाणाऱ्या व्यक्तीने ही पिशवी फेकल्याचं दिसून आले. त्यानंतर त्या स्कूटीवाल्याचा शोध पोलिसांनी घेतला. तपासात ही स्कूटी सदियापूर गुरुद्वारा येथे राहणाऱ्या शरण सिंहची असल्याचे तपासात समोर आले.

पुतण्याचा मुलगा होता पीयुष

पीयूष मंगळवारी सकाळपासून बेपत्ता होता. त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे, तो त्याच्या आईसोबत सदियापूर येथे राहत होता. याप्रकरणी माहिती देताना त्याची आई म्हणाली, पीयुष मंगळवारच्या सकाळपासून घराबाहेर पडला होता. दुपारीपर्यंत घरी येत असायचा पण मंगळवारी ते घरी परतलाच नाही. त्यामुळे शाळेत जाणून त्याचा शोध घेतला परंतु तो तेथेही नव्हता. पीयुष हा आरोपी शरण सिंह यांच्या पुतण्याचा मुलगा होता.

पीयुषच्या हत्येप्रकरणी जेव्हा शरणसिंह याला ताब्यात घेण्यात आलं तेव्हा त्याने पोलिसांना उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला.

नरबळीसाठी घेतला नातवाचा जीव

पोलीस चौकशीत आरोपी शरण सिंहने आपण तांत्रिकाच्या सांगण्यावरून नरबळी दिल्याचा धक्कादायक खुलासा केला. काही काळापूर्वी शरण सिंहची मुलगी आणि मुलगा या दोघांनी आत्महत्या केली होती. या घटनेमुळे शरण सिंहला धक्का बसला होता.

तेव्हा त्याने एका तांत्रिकाशी संपर्क केला. त्यावेळी तांत्रिकाने त्याला ग्रहदोष असल्याचं सांगितलं होतं. मुलगा किंवा मुलगी यांच्या वयाच्या मुलाचा बळी दिला तर ग्रहदोष दुरू होतील असं मांत्रिकाने सांगितले होतं. त्यानंतर शरण सिंहने पीयूषच्या हत्येचा कट रचला. हत्येनंतर पीयूषचे हात पाय आणि शीर कापून एका जंगलात फेकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matheran Horses: माथेरानमधील घोड्यांना विचित्र आजाराची लागण|VIDEO

Thane Metro : ठाणेकरांचे मेट्रोचं स्वप्न साकार, आजपासून ट्रायल रन सुरू | VIDEO

Maharashtra Live News Update: औषधे आजपासून होणार स्वस्त

Chutney Recipe : वजन वाढले? चपातीसोबत खा 'ही' चटणी, कायम राहाल स्लिम अँड ट्रिम

Navratri Wishes 2025: तू गं दूर्गा, तू भवानी..., शारदीय नवरात्रीच्या पवित्र दिवशी आपल्या प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा

SCROLL FOR NEXT