Uttar Pradesh Crime Saam tv
क्राईम

Crime: भाच्याच्या प्रेमात वेडी झाली, मामीने नवऱ्याला जिवानीशी संपवलं; मृतदेह खाटेसह जमिनीत पुरला नंतर...

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये भयंकर घटना घडली. भाच्याच्या प्रेमात वेडी झालेल्या महिलेने नवऱ्याला संपवलं. त्यानंतर मृतदेह खाटसोबत जमिनीमध्ये पुरला. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली.

Priya More

उत्तर प्रदेशच्या कानपुरमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या नवऱ्याची एका महिलेने भाच्याच्या मदतीने हत्या केली. आरोपींनी हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो बागेमध्ये नेऊन खाटेसह मृतदेह पुरला. मृतदेह पुरताना त्यावर त्यांनी १२ किलो मीठ देखील टाकले. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

पप्पा कुठे आहेत? असं मुलं विचारत राहिली तेव्हा आरोपी महिला मुलांना सांगत राहिली की पप्पा गुजरातला गेले आहेत. पण ३११ दिवसांनंतर मृत व्यक्तीच्या आईमुळे या हत्याकांडामागचं सत्य बाहेर आलं. मिळालेल्या माहितीनुसार, साचेंडीच्या लालपूर गावामध्ये राहणाऱ्या लक्ष्मीचा अमित नावाचा भाचा आहे. दोघांना एकमेकांवर प्रेम झाले. दोघे प्रेमात ऐवढे बुडाले की या प्रेमात लक्ष्मीचा नवरा अडथळा ठरू लागला. त्यामुळे लक्ष्मीने तिचा नवरा शिवबीर सिंगपासून सुटका करून घेण्याचा प्लान तयार केला.

३० ऑक्टोबर २०२४ रोजी देशभरात दिवाळी साजरी केली जात होती. पण त्याच रात्री लक्ष्मीने तिच्या नवऱ्याला मारण्याचा कट रचला. लक्ष्मीने चहामध्ये गुंगीचे औषध मिक्स केले आणि तिच्या नवऱ्याला दिले. शिवबीर बेशुद्ध होताच लक्ष्मी आणि भाचा अमित यांनी मिळून लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिवबीरचा काही मिनिटांतच मृत्यू झाला.

हत्येनंतर दोघांनी मध्यरात्री घराजवळील बागेत एक खड्डा खोदला. शिवबीरचा मृतदेह खड्ड्यात टाकण्यात आला आणि त्यावर १२ किलो मीठ टाकण्यात आले जेणेकरून मृतदेह लवकर कुजेल आणि पुरावे नष्ट होतील. मृतदेह टाकल्यानंतर खड्डा मातीने झाकण्यात आला. सकाळी मुलं झोपेतून उठली आणि पप्पा कुठे आहेत असे विचारू लागली. तेव्हा लक्ष्मी म्हणाली, तुमचे पप्पा कामासाठी गुजरातला गेले आहेत. त्या दिवसापासून तीन महिने मुलांना आणि कुटुंबाला ती खोटं सांगत राहिली.

शिवबीरची आई सावित्रीला सुरूवातीपासूनच सून आणि नातूवर संशय होता. त्यांचे प्रेमप्रकरण सुरू असल्याचे तिला वाटत होते. जेव्हा त्यांचा मुलगा अचानक गायब झाला आणि त्याचा फोन बंद झाला तेव्हा त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी सुरूवातीला शिवबीर गुजरातला गेला असल्याचे सांगून प्रकरण फेटाळून लावले. पण सावित्री पोलिस ठाण्यात सतत जात राहिल्या. शेवटी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत तपास सुरू केला. पोलिसांनी शिवबीरच्या बायकोचा मोबाईल तपासला असता ती सतत भाचा अमितशी बोलत असल्याचे समोर आले. त्यानंतर दोघांची कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनी गुन्हा कबुल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti : ही ३ गुपितं कोणालाही सांगू नका; नाहीतर जवळचे मित्रसुद्धा होतील शत्रू

Nepal Protest : नेपाळ पेटलं! माजी मंत्र्याचे घर पेटवलं, राष्ट्रपतींच्या घरावर कब्जा, पंतप्रधान देश सोडण्याच्या तयारीत

Vande Bharat Ticket Price: मुंबई, नागपूर, दिल्ली ते चेन्नई, वंदे भारत ट्रेनचं तिकीट किती? वाचा सविस्तर

Maratha Reservation: मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची मनोज जरांगेवर टीका, म्हणाले... VIDEO

5 स्टार रेटिंग असलेली कार १ लाखांनी स्वस्त, Nissan Magnite कारची नवीन किंमत किती?

SCROLL FOR NEXT