Crime Saam tv
क्राईम

हत्याकांडाचा थरारक उलगडा, सख्खा भाऊच निघाला मास्टरमाईंड कट! भावाला संपवण्यासाठी दिली होती २० हजारांची सुपारी

Crime News : गुजरातच्या सदगव्हाण येथे उखड्या वसावे यांच्या हत्येचा पोलिसांनी उलगडा केला आहे. सख्ख्या लहान भावानेच २० हजारांची सुपारी देऊन मोठ्या भावाचा खून केल्याचा आरोप असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

तळोद्यापासून अवघ्या पाच किलोमीटरवरील गुजरातच्या सदगव्हाण येथे आढळलेल्या उखड्या वसावे यांच्या खुनाचा अखेर पोलिसांनी छडा लावला आहे. या हत्याकांडामागे अनोळखी मारेकरी नसून मृताचा सख्खा लहान भाऊच सूत्रधार असल्याचा धक्कादायक खुलासा तापी जिल्हा पोलिसांनी केला आहे. मोठ्या भावाचा काटा काढण्यासाठी लहान भावानेच २० हजार रुपयांची सुपारी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, या प्रकरणी मयताचा सख्खा भाऊ आणि त्याचा साडू अशा दोघांना महाराष्ट्रातील धडगाव तालुक्यातून अटक करण्यात आली आहे.

तापी जिल्हा पोलिसांच्या माहितीनुसार, मृत उखड्या वसावे यांचा लहान भाऊ मानसिंग उर्फ मानसी याच्या पत्नीला मागील सहा महिन्यांपासून मृताकडून त्रास होत असल्याचा आरोप आहे. याच कारणावरून कुटुंबात वारंवार वाद होत होते. या वादातूनच मानसिंगने आपल्या साडू जयराम विजय नाईक याच्यासोबत मोठ्या भावाच्या हत्येचा कट रचल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या कामासाठी २० हजार रुपयाची सुपारी ठरवण्यात आल्याची माहिती पोलिसांसमोर आली आहे.

पत्नीला भेटण्याच्या बहाण्याने नेले अन् पाहुबा महाराज मंदिराजवळ खून!पोलिसांच्या तपासानुसार, १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी जयराम नाईक याने उखड्या वसावे यांना त्यांची पत्नी कापूस वेचण्यासाठी तुळाजा गावात गेल्याचे सांगून सोबत नेले. क्रमांक नसलेल्या युनिकॉर्न मोटारसायकलवरून दोघे निघाले. सदगव्हाण परिसरात पाहुबा महाराज मंदिरासमोरील निर्जन जागी नेऊन साडीच्या लेसने गळा आवळून उखड्या वसावे यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यानंतर ओळख पटू नये म्हणून विटेच्या तुकड्याने आणि दगडाने चेहऱ्यावर वार करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याचेही प्रेस नोटमध्ये नमूद आहे.

१७ नोव्हेंबर रोजी मृतदेह आढळल्यानंतर मृताची ओळख पटविणे आणि खुनाचा छडा लावणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. स्थानिक गुन्हे शाखा तापी आणि कुकरमुंडा पोलिसांनी मानवी गुप्तचर माहिती, तांत्रिक तपास आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे स्वतंत्र पथके तयार केली. तपासादरम्यान मृताची ओळख पटली आणि नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयाची सुई लहान भाऊ मानसिंगकडे वळली.

चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी धडगाव तालुक्यातील कुवरखेत येथे जाऊन जयराम विजय नाईक यालाही ताब्यात घेतले. अखेर या हत्याकांडात सहभागी असल्याच्या आरोपावरून मानसिंग आणि जयराम या दोघांना अटक करण्यात आली.

या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी एक युनिकॉर्न मोटारसायकल, किंमत अंदाजे ८० हजार रुपये, तसेच दोन मोबाईल फोन, किंमत अंदाजे ६ हजार रुपये, असा एकूण ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.तापी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जे. एन. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा तापी आणि कुकरमुंडा पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.

एका अनोळखी मृतदेहापासून सुरू झालेल्या या तपासाचा शेवट सख्ख्या भावानेच खुनाची सुपारी दिल्याच्या धक्कादायक खुलाशाने झाला आहे. रक्ताच्या नात्यालाच काळिमा फासणाऱ्या या प्रकरणाने नंदुरबार आणि तापी जिल्ह्याच्या सीमावर्ती परिसरात मोठी खळबळ उडवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

कोर्टाचा मोठा निर्णय! जावयाच्या हत्येप्रकरणी पत्नीसह सासरच्या पाच जणांना जन्मठेप

Men VS Women: पुरुष जास्त खोटं बोलतात की महिला? दोघांच्या स्वभावातील हा फरक तुम्हाला माहीत आहे का?

How Often Should You Wash Jeans: जीन्स किती वेळा धुवावी? प्रत्येक वापरानंतर धुणे योग्य आहे का?

Microwave Placement Vastu: किचनमध्ये फ्रीजच्या जवळ मायक्रोवेव ठेवावा का? जाणून घ्या वास्तू शास्त्रानुसार दोघांमध्ये किती अंतर असलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT