Mother Throws Crying Infant into Water Tank Saam tv
क्राईम

Crime News: माता न तू वैरिणी! बाळ सतत रडतंय, संतापलेल्या आईने थेट पाण्याच्या टाकीत टाकलं

Mother Throws Crying Infant into Water Tank: बाळ सतत रडत असल्यामुळे संतप्त झालेल्या महिलेने आपल्या पोटच्या ३ महिन्याच्या बाळाला पाण्याच्या टाकीत टाकून त्याची हत्या केली. ही घटना गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडली. या प्रकरणी महिलेला पोलिसांनी अटक केली.

Priya More

गुजरातच्या अहमदाबादमध्ये राहणाऱ्या एका महिलेने आपल्या ३ महिन्यांच्या बाळाची हत्या केली. या २२ वर्षीय महिलेने आपल्या मुलाला भूमिगत पाण्याच्या टाकीत फेकून त्याची हत्या केली. या महिलेला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी या महिलेची चौकशी केली तेव्हा हत्येमागील कारण एकून पोलिसही चक्रावले. बाळ सतत रडतं या छोट्याशा कारणावरून या महिलेने ३ महिन्यांच्या मुलाला मारून टाकलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करिश्मा बघेल असं बाळाची हत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. या महिलेने बाळाची हत्या केली पण तिने आपले बाळ बेपत्ता असल्याचा दावा केला होता. बाळ कुठेच सापडत नसल्यामुळे महिलेच्या पतीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी ही महिला राहत असलेल्या अंबिकानगर परिसरातील तिच्या घरातील पाण्याच्या टाकीची झडती घेतली त्याठिकाणी त्यांना बाळाचा मृतदेह आढळून आला.

बाळाचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांना महिलेवर संशय आला. कारण घरानजीकच्या टाकीमध्येच बाळाचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी महिलेला अनेक प्रश्न विचारले तेव्हा ती त्यांना नीट उत्तर देत नसल्याचे त्यांचा संशय आणखी बळावला. पोलिसांनी महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेत तिची कसून चौकशी केली. तेव्हा महिलेने आपल्या बाळाची हत्या केल्याची कबुली दिली. बाळाला मीच पाण्याच्या टाकीत फेकून दिल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यानंतर या महिलेला पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी सांगितले की, 'गरोदर असल्यापासून ही महिला भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ होती. ती नेहमीच काही आरोग्य समस्यांची तक्रार करत असे. बाळ जन्माला आले तेव्हाही हे वर्तन चालू राहिले. ती तिच्या कुटुंबातील सदस्यांना सांगायची की तिचे बाळ खूप रडत असल्याने ती अस्वस्थ आहे. सतत बाळ रडत असल्यामुळे ही महिला संतप्त झाली आणि तिने बाळाला पाण्याच्या टाकीत फेकून दिलं. या घटनेमुळे अहमदाबादमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT