
नाशिक शहरात पुन्हा एकदा रिक्षा चालकाचा प्रताप समोर आला आहे. सराईत गुन्हेगार असलेल्या रिक्षा चालकाने बसमधून उतरलेल्या महिलेची वाट अडवली आणि या महिलेसमोर नग्न होत अश्लील हावभाव करून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलिस ठाण्यात रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
नाशिक शहरात रिक्षाचालकांची मुजोरी वाढताना दिसून येत आहे. नाशिक शहरात सराईत गुन्हेगार असलेल्या रिक्षा चालकाने अंगावरील कपडे काढत अश्लील हावभाव करत महिलेचा विनयभंग केला. या घटनेमुळे शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सराईत गुन्हेगार असलेला आणि शहरातून तडीपार असलेल्या रिक्षा चालकांने नादुरुस्त असलेल्या सिटीलिंग बसमधून उतरलेल्या महिलेची वाट अडवत कुठे जायचं आहे? असं विचारत अश्लील हावभाव करत गैरवृत्य केलं. त्यानंतर बसवर दगडफेक करत चालक आणि वाहकाला देखील शिवीगाळ करत मारहाण केली.
रिक्षाचालकाचे हे कृत्य पाहून घाबरलेली महिला पुढे निघून जायला लागली. तर त्या रिक्षाचालकाने महिलेची वाट आडवली आणि अंगावरचे कपडे काढून अश्लिल इशरे करत तिचा विनयभंग केला. तसेच, 'तुझे छोडूंगा नहीं' अशी धमकीही दिली. घाबरलेल्या अवस्थेत महिलेने कसं तरी आपले घर गाठले आणि दुसऱ्या दिवशी मुंबई नाका पोलिस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता याप्रकरणी तक्रार नोंदवून घेत रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी रिक्षाचालकाला शोधून त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याच्याकडे असलेली रिक्षा देखील ताब्यात घेतली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात सराईत गुन्हेगार असलेला २० वर्षीय रिक्षा चालक मिजान रजा उर्फ मल्ला सादिक शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्याता आला. दरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या रिक्षाचालकाला कोर्टात हजर केले जाणार आहे. या आरोपीवर कडक कारवाई करण्यात येईल असे देखील पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पोलिसांनी अटक केलेला रिक्षा चालक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरीसह दंगलीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.