Crime against children Saam Tv
क्राईम

Crime news: माणुसकीला काळीमा फासणारी घटना, ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

Crime against children: बिहारच्या बक्सर जिल्ह्यात दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. एका चिमुकलीवर अत्याचार तर दुसऱ्या घटनेत आठ वर्षांच्या मुलाची हत्या झाली. पोलिस तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे.

Surabhi Jayashree Jagdish

बिहारच्या बक्सर जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. बक्सर जिल्ह्यातील मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात रविवारी दुपारी पाच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आलीये. ही चिमुकली एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत रडत होती. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून गावकरी धावले आणि तेव्हा हा प्रकार समोर आला.

यावेळी त्या चिमुकल्या मुलीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणात आरोपीदेखील अल्पवयीन असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. दरम्यान याबाबत अजून गुन्हा नोंदवला गेलेला नाही. पोलीस तपास करत असून पुढील कारवाईची तयारी सुरू आहे.

ही एकच घटना नसून सिमरी बख्तियारपूरच्या सिटानाबाद दक्षिणी पंचायतातील पठाण टोला, वार्ड क्रमांक ७ मध्ये रविवारच्याच दिवशी संध्याकाळी जुन्या वैमनस्यातून आठ वर्षांच्या ओबेश या मुलाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली. त्याला वाचवण्यासाठी धावलेली त्याची मोठी बहीण हिच्या हाताला किरकोळ जखम झाल्याची माहिती आहे.

मृत्यू झालेल्या मुलाची आई सकीना खातून यांनी सांगितलं की, त्यांचा मुलगा घराजवळ खेळत होता. यावेळी त्यांच्या शेजाऱ्याने जुन्या एका रागातून हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला सिमरी बख्तियारपूरच्या अनुमंडलीय रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

या घटनेबाबत एसडीपीओ मुकेश कुमार ठाकूर यांनी माहिती देताना सांगितलं की, प्राथमिक तपासात हा खून असल्याचं दिसतंय. या हत्येप्रकरणी आरोपीचा शोध घेण्यात येतोय. तसंच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT