Nanded News Saam Tv
क्राईम

Crime News : वाईन मार्टचे मालक आणि मॅनेजरवर जीवघेणा हल्ला; नांदेडमध्ये खळबळ

Nanded News : नांदेडच्या वजीराबाद परिसरात वाईन मार्टवर दोन अज्ञात गुंडांनी हल्ला करून मालकाला गंभीर जखमी केले. सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून १.४० लाख रुपयांचा ऐवज लुटला. पोलिसांचा तपास सुरू असून व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Alisha Khedekar

  • वजीराबाद परिसरात वाईन मार्टवर दोन अज्ञात गुंडांचा हल्ला.

  • मालक रितेश जयस्वाल यांना गंभीर जखमी करून सोन्याचे दागिने व अंगठी लुटली.

  • तब्बल १.४० लाख रुपयांचा ऐवज हिसकावून आरोपी फरार.

  • सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू केला आहे.

नांदेड शहरात पुन्हा एकदा गुंडगिरीचा धक्कादायक प्रकार घडला असून, शहरातील वजीराबाद परिसरात असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आवारात चालणाऱ्या वाईन मार्टमध्ये दोन अज्ञात इसमांनी धुमाकूळ घातला आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला असून, या हल्ल्यात वाईन मार्टचे मालक रितेश जयस्वाल व त्यांच्या मॅनेजरवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघे आरोपी वाईन मार्टमध्ये आले आणि सुरुवातीला त्यांनी ग्राहक असल्याचा बहाणा करत दारू विकत घेतली. मात्र, त्यानंतर त्यांनी उघडपणे पैसे न देता मालकावर दबाव आणला. एवढेच नाही, तर "आमच्याकडून पैसे घेतले जात नाहीत, उलट तुम्हालाच दर महिन्याला दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल" अशा शब्दांत धमकी दिली.

अचानक उफाळून आलेल्या या वादात जयस्वाल यांनी विरोध केल्यावर आरोपींनी त्यांच्या डोक्यावर दारूची बाटली फोडली. या हल्ल्यात जयस्वाल गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी काठीने त्यांच्या हातावर आणि पायावर बेदम मारहाण केली. फक्त एवढ्यावर न थांबता आरोपींनी जयस्वाल यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि बोटातील सोन्याची अंगठी हिसकावून घेतली.

तब्बल १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज घेऊन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या संपूर्ण घटनेचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या पुराव्याच्या आधारे वजीराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर व्यापारी वर्गात आणि परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FASTag Pass: फास्टॅग पासच्या किंमती वाढल्या; १ एप्रिलपासून लागू; किती पैसे मोजावे लागणार?

Maharashtra Live News Update : नागपूरमध्ये मेट्रोचा गर्डर तुटून अपघात

Aishwarya Narkar : "कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून..."; ट्रोल करणाऱ्यांना प्रसिद्ध अभिनेत्रीने सुनावले खडेबोल, थेट स्क्रीनशॉट केले शेअर

भरधाव कारने तरुणीला फुटपाथवर चिरडले, २०० मीटर फरफटत नेलं; बाईक, रिक्षा अन् कारला धडक; थरार सीसीटीव्हीत कैद

Weight Loss Juice : जिम नको, डाएट नको! वजन कमी करण्यासाठी हे 5 ज्यूस नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT