Pimpri Chinchwad Saam TV
क्राईम

Crime News : उद्धव ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाच्या मुलाची दगडाने ठेचून हत्या, पिंपरी चिंचवडमधील खळबळजनक घटना

Pimpri-Chinchwad Crime News : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विभाग प्रमुख विजय थोरी यांच्या मुलाचा काल मध्यरात्री निर्घृण खून करण्यात आला आहे. विशाल विजय थोरी असे या 23 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे.

गोपाल मोटघरे

Pimpri - Chinchwad News :

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विभागप्रमुख विजय थोरी यांच्या मुलाची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या देहूरोड परिसरात ही घटना घडली आहे. (Latest Crime News)

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विभाग प्रमुख विजय थोरी यांच्या मुलाचा काल मध्यरात्री निर्घृण खून करण्यात आला आहे. विशाल विजय थोरी असे या 23 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय देहूरोड पोलिसांनी व्यक्त केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विकासनगर किवळे भागात असलेल्या श्री साई दर्शन कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या जवळच अज्ञात लोकांनी विशालची दगडाने ठेचून हत्या केली आहे. विशाला मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांना गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विकास नगर येथे रात्री 1 वाजेच्या सुमारास विशाल थोरी याच्यावर चार ते पाच जणांच्या टोळक्यांने हल्ला केला. त्याच परिसरातील चार ते पाच तरुणांची विशालवर जीवघेणा हल्ला केला. विशालला काही कळण्याच्या आतच त्याच्यावर दगड लाठ्याकाठ्यांनी हल्ला केली. विशालच्या डोक्यामध्ये व तोंडावर कुंडी मारली. सिमेंटचा गट्टू व लाकडी बांबूने मारहाण करून त्याला जीवे मारलं. सर्व आरोपींना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - विधान परिषद निवडणुकीची आज मतमोजणी, निकालाकडे सर्वांचे लक्ष

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

SCROLL FOR NEXT