Shirur Crime रोहिदास गाडगे
क्राईम

Shirur Crime: भावकीच्या वादातून दोन गटात तुफान राडा.. बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू; शिरुर तालुका हादरला

Shirur Crime News: कौटुंबिक वादातून झालेल्या या राड्यामध्ये झालेल्या मारहाणीत एक तरुण गंभीर जखमी झाला होता. या जखमी तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

रोहिदास गाडगे

पुणे|ता. २९ एप्रिल २०२४

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील शिंदेवाडी गावात बैलगाडा शर्यतीदरम्यान दोन कुटुंबात जोरदार राडा झाल्याची घटना रविवारी घडली. कौटुंबिक वादातून झालेल्या या राड्यामध्ये झालेल्या मारहाणीत एक तरुण गंभीर जखमी झाला होता. या जखमी तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक प्रकाराने शिरुर तालुका हादरुन गेला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मलठण येथील शिंदेवाडी येथे गावच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या बैलगाडा शर्यतीदरम्यानच भाऊबंदकीच्या जुन्या वादातून दोन गट आमने सामने आले. हा कौटुंबिक वाद इतका टोकाला गेला की दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली.

या मारहाणीत संजय शिंदे हा तरुण गंभीर जखमी झाला होता. या जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भानुदास शिंदे, ज्ञानोबा शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास करत आहेत.

जमिनीच्या जुन्या वादातून ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे. या वादात गावच्या यात्रा कमीटीचा ग्रामस्थांचा काहीही सबंध नसून हा दोन कुटूंबातील भावकीचा वाद असल्याचे ग्रामस्थाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या धक्कादायक घटनेने शिरुर तालुका हादरुन गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priya Marathe : प्रिया मराठे यांची शेवटची पोस्ट व्हायरल, नवऱ्यासाठी लिहिला होता खास मेसेज

Sambhajinagar : दोन जिवलग मित्रांचा करुण अंत; जनावरे चारताना तलावात पोहण्यासाठी उतरले असता बुडाले

Dengue symptoms neurological: डेंग्यूची लक्षणं हलक्यात घेऊ नका; मेंदूशी संबंधित गुंतागुंती वाढू शकतात, डॉक्टरांचा इशारा

'तो तरूण तुम्हाला बघून हस्तमैथुन..' लोकलमध्ये तरूणीच्या बाजूला बसून घाणेरडं कृत्य, नंतर जे घडलं ते भयंकर

Manoj Jarange Patil Protest Live Updates : शरद पवार दुपारी ३ वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होणार

SCROLL FOR NEXT