shahupuri police arrests 7 youth from kolhapur karad pune in fake currency case saam tv
क्राईम

Crime News : बनावट नोटा चलनात आणणा-या रॅकेटचा पर्दाफाश; कराड, कोल्हापूरसह पुण्यातील सात युवकांना अटक

Kolhapur Crime News : पोलिसांच्या तपासात बनावट नोटांची मागणी करणा-यांपासून ते पोहोचवणारी साखळी उलगडली. डिपॉझिट मशीनमध्ये नोटा भरणा-या व्यक्तीला पोलिसांनी या गुन्ह्यात साक्षीदार बनवले आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur :

बनावट नोटा छापून त्या चलनात आणणा-या रॅकेटचा काेल्हापूरच्या शाहूपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी कोल्हापूर, कराड आणि पुण्यातील सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून नोटा छापण्यासाठी वापरलेला प्रिंटर, कागद, लॅपटॉप, वाहने असे साहित्य जप्त केले. ताराराणी चौकातील एका खासगी सावकाराच्या मुलाचाही यात समावेश आहे. मित्राला मदत करण्यासाठी आणि चैनीसाठी पैसे उपलब्ध व्हावेत, यासाठी बनावट नोटा छापल्याची कबुली त्यांनी पोलिसांकडे दिली. (Maharashtra News)

राजारामपुरी येथील एका एटीएम सेंटरच्या डिपॉझिट मशीनमध्ये ५०० रुपयांच्या २० बनावट नोटा जमा झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. २८ मार्च रोजी घडलेल्या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन शाहूपुरी पोलिसांनी तपास केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बनावट नोटा जमा झालेले खाते नवी मुंबईतील एका व्यक्तीचे होते. मात्र, कोल्हापुरातील मित्राने त्याच्या खात्यावर पैसे जमा केले होते. डिपॉझिट मशीनमध्ये पैसे जमा करणा-या संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर बनावट नोटा छापणा-या रॅकेटचा पर्दाफाश झाला.

बनावट नोटा पुणे आणि कराड येथील तरुणांकडून मिळाल्याचे समजताच पोलिसांनी छापेमारी करून संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील प्रिंटर, कागद, लॅपटॉप, कटर आणि काही बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सातही जणांची पोलिस कोठडीत रवानगी झाली असून, त्यांच्या अधिक चौकशीत रॅकेटची व्याप्ती समोर येण्याची शक्यता निरीक्षक अजय सिंदकर यांनी व्यक्त केली.

कर्जाचा बोजा वाढल्याने रोहन सूर्यवंशी हा पैशांच्या शोधात होता. इंदापुरातील मित्र अजिंक्य चव्हाण याने त्याला बनावट नोटा घेऊन कर्जाची परतफेड करण्याचा मार्ग सूचवला. त्यासाठी त्याने पुण्यातील केतन थोरात-पाटील याचा मोबाइल नंबर दिला.

बनावट नोटा आणण्यासाठी रोहन याने पुजारी आणि पास्ते यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर त्याने पुण्यात जाऊन केतन याच्याकडून दहा हजारांच्या बदल्यात २५ हजारांच्या बनावट नोटा आणल्या. त्यातील प्रत्येकी १२ हजार रुपये पुजारी आणि पास्ते यांना दिले. स्वत:कडे ठेवलेले एक हजार रुपये खर्च केले. पास्ते याने दहा हजाराच्या बनावट नोटांसह एकूण ५० हजार रुपये दरमहा १४ टक्के व्याजाने एका व्यक्तीला दिले. ते पैसे डिपॉझिट मशीनमध्ये भरल्यानंतर बनावट नोटांचा प्रकार समोर आला.

पोलिसांच्या तपासात बनावट नोटांची मागणी करणा-यांपासून ते पोहोचवणारी साखळी उलगडली. डिपॉझिट मशीनमध्ये नोटा भरणा-या व्यक्तीला पोलिसांनी या गुन्ह्यात साक्षीदार बनवले आहे. त्याला बनावट नोटांची काहीच कल्पना नव्हती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी रोहन तुळशीराम सूर्यवंशी कुंदन प्रवीण पुजारी, ऋषिकेश गणेश पास्ते अजिंक्य युवराज चव्हाण, केतन जयवंत थोरात-पाटील, रोहित तुषार मुळे आणि आकाश राजेंद्र पाटील अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. यातील दोघे सिव्हिल इंजिनिअर आहेत. एकाने बीटेक केले आहे. एक बीबीएच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. नोटांचे डिझायनिंग आणि छपाई करणारा रोहित याने कमर्शियल आर्टचे शिक्षण घेतले आहे. तर अजिंक्य हा कायद्याच्या पदवीचे शिक्षण घेत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT