Dound Crime Saam tv
क्राईम

Satara Crime: संतापजनक! बस स्थानकातील क्लार्ककडून मुलींची छेड; महिलांनी दिला बेदम चोप, साताऱ्यातील घटना

Satara Latest News: संतप्त झालेल्या महिलांनी छेडछाड काढणाऱ्या व्यक्तीवर वॉच लक्ष ठेवून सायंकाळी तो त्या परिसरात दिसताच त्याला महिलांनी बेदम चोप दिला. अचानक घडलेल्या या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली

ओंकार राजेंद्र कदम

सातारा, ता. २५ ऑगस्ट २०२४

राज्यामध्ये महिला अत्याचाराचे सत्र काही थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. बदलापूर प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली असतानाच आता साताऱ्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातारा एसटी बसस्थानकामध्ये कार्यरत असणाऱ्या क्लार्कने अल्पवयीन मुलींची छेड काढल्याचा प्रकार समोर आला असून संतप्त महिलांनी या क्लार्कला बेदम चोप दिला आहे. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सातारा एसटी बसस्थानकामध्ये कार्यरत असणाऱ्या क्लार्कने अल्पवयीन मुलींची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मुलींनी याबाबत घरच्यांना माहिती दिल्यानंतर संतप्त महिलांनी या क्लार्कला बेदम चोप दिला तसेच याबाबत पोलिसांमध्येही तक्रार दाखल करण्यात आली आहे. युवतीची छेड काढल्यानंतर तिने हा सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला.

ज्यानंतर संतप्त झालेल्या महिलांनी छेडछाड काढणाऱ्या व्यक्तीवर वॉच लक्ष ठेवून सायंकाळी तो त्या परिसरात दिसताच त्याला महिलांनी बेदम चोप दिला. अचानक घडलेल्या या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी संबंधित क्लार्कला शहर पोलीस ठाण्यात दाखल केले असता त्याच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, पालघरच्या तारापूरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या घराशेजारी राहणाऱ्या 42 वर्षीय आरोपीने अल्पवयीन मुलीला घरात बोलवत अश्लील चाळे केले. याप्रकरणी तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

Budh Gochar: 12 महिन्यांनी बुध करणार गुरुच्या राशीत प्रवेश; 'या' राशींच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा

Success Story: हालाखीची परिस्थिती, शाळेसाठी रोज ६ किमी पायपीट; मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IPS सरोज कुमारी यांचा प्रवास

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

SCROLL FOR NEXT