Walmik Karad Surrender  Saam Tv
क्राईम

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाचा घटनाक्रम, असा शरण आला वाल्मीक कराड

Walmik Karad Surrender: वाल्मीक कराड सीआयडीसमोर शरण होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आज १२ वाजता वाल्मीक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात हजर झाला.

Bharat Jadhav

Walmik Karad: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असणाऱ्या वाल्मीक कराडने आज सीआयडीसमोर स्वत: शरण केलं. पुण्यातील सीआयडीच्या समोर वाल्मीक कराडने सरेंडर केलं. दोन दिवसांपासून वाल्मीक कराड शरण होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आज अखेर त्याने आत्मसमर्पण केलं. संतोष देशमुख हत्या आणि आरोपीचं आत्मसमर्पण घटनाक्रम आपण जाणून घेऊ.

पोलिसांनी कशाप्रकारे तपास केला? आरोपींच्या नाड्या कशा आवळल्या. याची माहिती आपण जाणून घेऊ. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम पुढील प्रमाणे.

6 डिसेंबर रोजी आवादा कंपनीच्या आवारात मारहाणीची घटना घडली. 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची केज मांजरसुंबा रोडवरील टोलनाक्या जवळून अपहरण करून हत्या करण्यात आले. यानंतर अपहरणाचा व हत्येचा गुन्हा केज पोलिसात दाखल करण्यात आला. 10 डिसेंबर रोजी पुरवणी जवाबात सात आरोपींची नावे घेण्यात आली.

यात 1) जयराम चाटे, 2)महेश केदार 3) प्रतीक घुले आणि 4)विष्णू चाटे या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तीन आरोपी फरार आहेत. खंडणी प्रकरणातील वाल्मीक कराड हे फरार आहेत.

घटनाक्रम वाचा

9 डिसेंबर रोजी तीन वाजता अपहरण.. 7 वाजता हत्या झाल्याचे समोर आले.

9 डिसेंबर रोजी रात्रभर ग्रामस्थ केज- मांजरसुंबा रोडवर ठिय्या देऊन बसले होते.

10 दहा डिसेंबर रोजी सकाळपासून पुन्हा ग्रामस्थांनी रोडवर ठिय्या आंदोलन केले. जरांगे पाटलांची देशमुख कुटुंबाची भेट आंदोलनात ठिय्या. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा अशी मागणी करण्यात आली होती ती मान्य करण्यात आली. या प्रकरणातील दोन आरोपीला पोलिसांनी पाठलाग करून केली अटक.

सायंकाळच्या वेळी पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देत ग्रामस्थांच्या मागण्या मान्य केला यानंतर 11 वाजता आंदोलन मागे घेण्यात आले. दहा तारखेला रात्री दोन वाजता संतोष देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार. 11 तारखेला केज पोलीस ठाण्यात खंडणी प्रकरणात विष्णू चाटे, सुदर्शन घुले, आणि वाल्मीक कराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल.

या प्रकरणात पोलिसांनी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले , विष्णू चाटे यांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. सीआयडीचे महासंचालक प्रशांत बुर्डे दोन दिवसांपासून बीडमध्ये ठाण मांडून बसले होते. सीआयडी कडे गुन्हा वर्ग केल्यानंतर सीआयडी चे महा संचालक, स्वतः बीड जिल्ह्यामध्ये दाखल झालेय. नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी पदभार घेताच घेतली देशमुख कुटुंबाची भेट.

त्यानंतर सीआयडी चे वरिष्ठमहासंचालक थेट केज मध्ये पोहोचले आणि त्या ठिकाणी देखील त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन चौकशी केल्याची माहिती आहे. चार तास पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत बैठक पार पडली. केज पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही ताब्यात घेतले 9 डिसेंबर चे सर्व सीसीटीव्ही फुटेज घेतले ताब्यात.

सलग दुसऱ्या दिवशी देखील सीआयडी चे महा संचालक बीडमध्ये दाखल प्रशांत बोर्डे दुसऱ्या दिवशी बीडच्या शहर पोलीस स्टेशन मध्ये पोहचले त्यांनी आरोपी विष्णू चाटे याची एक तास चौकशी केल्याची माहिती अटकेत असलेल्या इतर आरोपींचीही सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी केल्याची माहिती.

ॲट्रॉसिटी प्रकरण, खंडणी प्रकरण ,आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण सीआयडी कडे वर्ग. 27 तारखेला वाल्मीक कराड यांच्या पत्नी कराड यांची सीआयडी कडून तीन तास पासून चौकशी. याचवेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची देखील चौकशी.

आरोपीच्या अटकेसाठी 28 तारखेला आक्रोश मोर्चा मोर्चा

आतापर्यंत खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांच्या पत्नीचे मंजली कराड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, दोन अंगरक्षक,राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे, यांच्यासह आणखी चार ते पाच महिलांची सीआयडीने चौकशी केली आहे.. तसेच केज 50 ते 60 व्यक्तींची चौकशी केल्याचे देखील माहिती आहे.. सीआयडीला आरोपीच्या मोबाईल मध्ये मारहाण करतानाचा व्हिडिओ मिळून आल्याने सीआयडी चा तपासाने वेग घेतला आहे.

त्यामुळे एकूणच सीआयडीने तपासामध्ये वेध घेतला असून या प्रकरणात गुन्ह्याशी संबंधित असलेल्या आरोपींच्या जवळच्या व्यक्तींचे चौकशी केली जात आहे. बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एकूण सात आरोपींविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

1) जयराम चाटे, 2)महेश केदार 3) प्रतीक घुले आणि 4)विष्णू चाटे या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तीन आरोपी फरार आहेत. यांच्या अटकेसाठी विशेष पथक मागावर आहे.

2)खंडणीच्या प्रकरणात सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मीक कराड हे आरोपी आहेत.. पैकी विष्णू चाटे हा एक आरोपी अटक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

SCROLL FOR NEXT