Crime news Saam Tv
क्राईम

Shocking : एसटीतून उतरली अन् चाकाखाली गेली; मोलमजुरी करणाऱ्या महिलेचा मृत्यू, कोल्हापुरातील घटना

Sangali Kolhapur Road : सांगली कोल्हापूर रोडवर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे महिलेचा एसटीखाली मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वपक्षीय कृती समितीने सांगली राजवाडा चौकातून तिरडी मोर्चा काढत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.

Alisha Khedekar

  • सांगली कोल्हापूर रोडवर महिलेचा एसटीखाली चिरडून मृत्यू झाला.

  • प्रशासनाच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरत नागरिकांनी तिरडी मोर्चा काढला.

  • मयत महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली.

  • “प्रशासन आणखी किती बळी घेणार?” असा संतप्त सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.

सांगली कोल्हापूर रोडवर सोमवारी महिलेचा गाडी खाली चिरडून मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना घडली. या घटनेला सर्वस्वी बांधकाम विभाग आणि महापालिका प्रशानाच्या अनास्थेचा हा बळी असल्याचा आरोप करत आज सर्वपक्षीय कृती समितीचे तर्फे तिरडी मोर्चा काढण्यात आला. दरम्यान आंदोलकांनी महापालिका प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

मोलमजूरी करत उदरनिर्वाह करून आपले कुटुंब चालवणाऱ्या महिलेचा प्रशासकीय अनास्थेमुळे बळी गेला. एक महिला कामानिमित्त कोल्हापूरला जाऊन तेथून सायंकाळी पुन्हा आपल्या घरी एसटीने येत होती. सांगली आकाशवाणीजवळ त्या एसटीतून उतरल्या. रस्त्यावर पावसाचे पाणी असल्याने त्या रस्त्याच्या कडेने चालत होत्या. याचवेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला. ज्या एसटीने त्यांनी प्रवास केला त्याच एसटीने त्यांना चिरडले.

या दुर्घटनेनंतर याला सर्वस्वी बांधकाम विभाग आणि महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे. बांधकाम विभाग आणि महापालिका प्रशासनाला धारेवर धरत आज सर्वपक्षीय कृती समितीचे तर्फे तिरडी मोर्चा काढण्यात आला. सांगलीच्या राजवाडा चौकातून हा मोर्चा बांधकाम विभाग प्रशासनावर काढण्यात आला.

या मोर्चादरम्यान मयत कुटुंबाला शासनाने आर्थिक हातभार लावावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच प्रशासन आणखी किती बळी घेणार ? या घटनेनंतर आता तरी प्रशासनाला जाग येणार का ? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच मृत महिलेच्या कुटुंबाला सरकडून मदतीचा हात पुढे येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: PM नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसाच्या निमित्त पुण्यात खास ड्रोन शो

Daily Horoscope: गोड बातमी मिळणार की ब्रेकअप होणार; प्रेमी जोडप्यांसाठी कसा असेल बुधवारचा दिवस?

IAS Transfer : मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच बदल्यांचे आदेश; राज्यातील २ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Pune News: बुधवार पेठेत गेला अन् हौस केली, नंतर पेमेंट अ‍ॅपचा पासवर्डच विसरला; ३ वेश्यांनी चांगलाच तुडवला

Wednesday Horoscope : व्यवहाराला गती, देवाणघेवाण टाळा; बुधवारचा दिवस १२ राशींसाठी कसा असणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT