Sangli News Saam TV
क्राईम

Sangli News: फिरायला जायचं सांगितलं आणि लॉजवर नेलं; ३ मैत्रिणींसोबत जे घडलं ते भयंकरच

Sangli Crime News: पाठलाग करताना त्यांनी मुलींशी संवाद साधला. गोड गोड बोलून त्यांना आपल्या जाळ्यात खेचलं. त्यानंतर त्यांना बाहेर फिरायला बोलावलं. आपल्याला गावाबाहेर फिरायला मिळणार या विचाराने मुली देखील तयार झाल्या.

Ruchika Jadhav

Crime News:

सांगलीच्या आटपाडी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलींना बाहेर फिरायला बोलावून तीन नराधमांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. सदर घटनेमुळे संपूर्ण आटपाडी तालुक्यात खळबळ पसरली आहे. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अल्पवयीन तिन्ही मुली एकाच गावात राहणाऱ्या होत्या. काही दिवसांपासून ३ मुलं या तिघींचा पाठलाग करत होते. पाठलाग करताना त्यांनी मुलींशी संवाद साधला. गोड गोड बोलून त्यांना आपल्या जाळ्यात खेचलं. त्यानंतर त्यांना बाहेर फिरायला बोलावलं. आपल्याला गावाबाहेर फिरायला मिळणार या विचाराने मुली देखील तयार झाल्या.

तिन्ही मुली २७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता आटपाडीच्या कल्लेश्वर मंदिराजवळ पोहचल्या. पुढे तिन्ही तरुण त्यांना घेऊन कौठुळी गावाच्या दिशेने निघाले. आपल्यासोबत पुढे घात होणार आहे. आपल्यावर मोठं संकट येणार आहे याबाबत मुलींच्या मनात जराही शंका नव्हती. बाहेर फिरण्यासाठी त्या फार उत्सुक आणि आनंदी होत्या.

प्रवासात अचानक तरुण मुंलींना वाटेतील एका लॉजवर घेऊन गेले. तेथे त्यांना जबरदस्ती करत तिघींवरही लैंगिक अत्याचार करण्यात आला. झालेला प्रकार मुलींनी आपल्या घरी कुटुंबीयांना सांगितला. हे सर्व ऐकून मुलीच्या घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी मुलींना घेऊन पोलीस स्टेशन गाठलं आणि मुलांबाबत तक्रार दाखल केली.

दाखल तक्रारीनुसार, आटपाडी पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chapati Health Side Effects: तुम्हीही रात्री चपाती खाताय, तर सावधान...

Healthy Soup: हिवाळा स्पेशल डिश; उत्तम आरोग्यासाठी बनवा 'हे' गरमागरम सूप

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री होऊ नये - रामदास आठवले

Cleaning Hacks: कपड्यांवरचे चहाचे डाग कसे काढावेत? वापरा सिंपल ट्रिक

रोज सकाळी उठल्यावर करा ही ५ योगासने, आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT