Crime News  Saam tv
क्राईम

Sangli Crime: धक्कादायक! विद्यार्थ्यांच्या पोषण आहारातील ४०० किलो तांदळाची चोरी; जत तालुक्यातील घटना

Sangli Breaking News: धक्कादायक बाब म्हणजे या आधी कोसारी जिल्हा परिषद शाळेत जूनमध्ये संगणक प्रिंटर, सौरऊर्जेच्या बॅटऱ्या, माईक, स्पीकर, तांदूळ असा मुद्देमाल चोरीस गेला आहे.

विजय पाटील

सांगली, ता. २२ सप्टेंबर

Sangli Crime News: विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह पोषण आहाराकरिता आणलेला ४०० किलो तांदूळ चोरट्यांनी लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीमधून समोर आला आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील याबाबत मुख्याध्यापक भीमसेन नामदेव नागणे यांनी जत पोलिसात तक्रार दिली असून जत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जत तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल कोसारी या प्रशालेत ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या प्रधानशक्ती माध्यान्ह पोषण आहार या योजनेअंतर्गत तांदूळ शिजवून दिला जातो. याकरिता शासनाने दिलेला तांदूळ प्रशालेतील व्हरांड्यातील कोठीमध्ये साठा केलेला होता. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शाळा उघडत असताना तांदळाच्या कोठीचे कुलूप तुटलेले दिसले.

शालेय परिसरात तांदळाचा इतरत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तांदूळ सापडला नाही. मुख्याध्यापक नागणे यांनी चोरीची फिर्याद दाखल केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आधी कोसारी जिल्हा परिषद शाळेत जूनमध्ये संगणक प्रिंटर, सौरऊर्जेच्या बॅटऱ्या, माईक, स्पीकर, तांदूळ असा मुद्देमाल चोरीस गेला आहे. याबाबत सुद्धा जत पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशातच पुन्हा न्यू इंग्लिश स्कूलमधील तांदळाची चोरी झाली आहे. चोरट्यावर पोलिसाचा वचक राहिला नाही. चोरट्यांचा शोध घेऊन लवकरात लवकर तपास पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थ व पालकांतून होत आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT