Sangli Breaking News Saamtv
क्राईम

Sangli Crime: रात्री ड्युटीवर गेला, सकाळी मृतदेह आढळला, ३० वर्षीय युवकासोबत घडलं भयंकर; सांगली शहर हादरलं!

Sangli Breaking News: डोक्यात दगड घालून तीस वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सांगली शहरात घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

विजय पाटील

सांगली, ता. ११ जून २०२४

डोक्यात दगड घालून तीस वर्षीय युवकाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सांगली शहरात घडली. शहरातील राजूनगर मंगळवार बाजार परिसरात घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगली शहरातील राजूनगर मंगळवार बाजार जवळील मज्जित समोर एका युवकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मयुरेश यशवंत चव्हाण (वय, 30 रा. भेंडवडे. ता. हातकणंगले.जि. कोल्हापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मयूर चव्हाण सांगलीतील एका हॉस्पिटलमध्ये केअर टेकरचे काम करत होता. काल रात्री आपल्या हॉस्पिटलचे कामावरून तो आठ वाजण्याच्या सुमारास बाहेर पडला अशी माहिती त्याच्या सहकार्याने दिली. त्यानंतर आज सकाळी मयूर याच्या खुनाचा प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या हत्येने शहरात खळबळ उडाली असून आरोपीला पकडण्यासाठी विविध ठिकाणी पथके तैनात करण्यात आली आहेत. घटनास्थळी उप पोलीस अधीक्षक प्रणिल गिल्डा , संजय नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी पाहणी केली. या हत्येचा अधिक तपास संजयनगर पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मावळात दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित

Mumbai Metro 11: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! वडाळ्यावरुन थेट गेट वे ऑफ इंडियाला जा, नव्या मेट्रो मार्गाला मंजुरी

Bollywood Controversy: इंडस्ट्री माफियांचा खरा चेहरा केला उघड; अभिनेत्रीने प्रसिद्ध दिग्दर्शकासोबतची कॉल रेकॉर्डींग केली लीक

Buldhana : शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! पोषण आहार रद्दी पेपरवर वाटला, प्रशासन तरीही गप्प?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! ७.५ लाख महिलांचे अर्ज बाद; कारण काय? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT