sambhajinagar police charged two for posting abusive video on national leaders Saam tv
क्राईम

Social Media मध्ये नेत्यांविषयी आक्षेपार्ह व्हिडिओ केला पोस्ट, दाेन गुन्हे दाखल

सध्या पोलिसांकडून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, कमेंट करणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात आहे. त्यासाठी स्वतंत्र सोशल मिडिया वॉर रूम तयार करण्यात आली असून विशिष्ट कमांडद्वारे सातत्याने लक्ष ठेवून आहेत.

डॉ. माधव सावरगावे

सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर शहरात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये पहिला गुन्हा हा मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तर दुसरा गुन्हा जिन्सी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. समाज माध्यमातील एका राजकीय ग्रुपमध्ये वक्तव्य केल्याप्रकरणी मोबाइल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आठवडाभरावर आलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात असतानाच सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य करण्याचे प्रमाणही वाढत आहे. लाेकसभा निवडणुक जाहीर झाल्यापासून पाेलिसांनी सोशल मीडियावर करडी नजर ठेवली हाेती. पाेलिसांनी आता वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल केले आहेत.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार एका युवकाने दाेन दिवसांपूर्वी रात्री समाज माध्यमात रिल अपलोड केले. त्यात देशातील नेत्यांचे छायाचित्रांचा वापर करून आक्षेपार्हरीत्या एडिटिंग करून व्हिडिओ पोस्ट केला. त्यावर तक्रार आली. मुकुंदवाडी पाेलिसांनी शहनिशा करीत गुन्हा दाखल केला. (Maharashtra News)

अन्य एका ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे एकावर जीन्सी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, कमेंट करणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात आहे. त्यासाठी स्वतंत्र सोशल मिडिया वॉर रूम तयार करण्यात आली असून विशिष्ट कमांडद्वारे सातत्याने लक्ष ठेवून आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rush Driving: रस्त्यावर वाहन चालवताना 'या' चुका केल्या तर नाही मिळणार विमा: सुप्रीम कोर्ट

Shocking: वॉशरूमध्ये लपून महिला सहकाऱ्यांचे VIDEO काढायचा, इन्फोसिसच्या इंजिनीअरला अटक

Nails Cutting Tips: नखं कापण्यासाठी योग्य दिवस कोणता?

कन्नड नगरपरिषदेची जुनी इमारत पत्त्यासारखी कोसळली, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना; थरारक VIDEO

Nashik News: देव्हाऱ्याखाली दारूचा साठा सापडला, दृश्य बघून पोलिसही चक्रावले | VIDEO

SCROLL FOR NEXT