crime news Saam Tv
क्राईम

Breaking News:'गरुडझेप' कोचिंग सेंटर की छळछावणी? प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, Video व्हायरल

Garud Zep Academy Student Harassment: छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेल्या बजाजनगर भागातील गरुड झेप अकॅडमीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अकॅडमीतील कर्मचाऱ्यांकडून प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली जात असल्याचं दिसत आहे.

Rohini Gudaghe

रामनाथ ढाकणे

Sambhajinagar Crime Student Harassment Video Viral

छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यातील बजाजनगरमध्ये असलेली गरुड झेप अकॅडमी (Garud Zep Academy) आता चांगलीच चर्चेत आली आहे. डिसेंबर महिन्यात एका विद्यार्थीनीने गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर 2 दिवसापूर्वीच एका मुलीने देखील आत्महत्या केली. त्यानंतर या अकॅडमीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. (Latest Crime News)

'गरुडझेप' कोचिंग सेंटर की छळछावणी असा प्रश्न आता निर्माण होताना दिसत आहे. अकॅडमीतील कर्मचाऱ्यांकडून प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली जात असल्याचं समोर आलं (Garud Zep Academy Student Harassment) आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना कर्मचाऱ्यांकडून थंड पाणी टाकून लाकडी दांड्याने अमानुषपणे मारहाण केल्याचंही स्पष्ट दिसतंय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अकॅडमीत विद्यार्थ्यांचा छळ

या घटनेमुळे आता अकॅडमीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे पालक वर्ग संताप व्यक्त करत आहेत. यावर कारवाईची मागणी केली जात (Student Harassment Video Viral) आहे. दरम्यान या अकॅडमीमध्ये पोलीस आणि सैन्य भरतीचे प्रशिक्षण घेणाऱ्या तरुण-तरुणींचा प्रचंड छळ सुरू आहे. प्रशिक्षणाच्या नावाखाली कडाक्याच्या थंडीत अंगावर पाणी टाकून काठी आणि बेल्टने बेदम मारहाण केल्याचा हा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

तरूण-तरूणी आपली स्वप्न घेऊन अकॅडमीमध्ये प्रवेश (Garud Zep Academy Viral Video) घेतात. पालक पैसे भरून आपल्या मुलांना शिकण्यासाठी पाठवतात. त्यांना या अकॅडमीमध्ये अशी भयंकर वागणूक मिळत आहे. गरुड झेप अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांचा छळ होत असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.

यापूर्वीची घटना

यापूर्वी याच अकॅडमीत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २० फेब्रुवारी रोजी घडली होती. लिना श्रीराम पाटील, असं मृत तरुणीचं नाव (Sambhajinagar Crime News) आहे. अकॅडमीत होणाऱ्या छळाला कंटाळून तिने असा निर्णय घेतल्याचं समोर आलं होतं. अकॅडमीत तिला अपमानास्पद वागणूक मिळाली. छळाला कंटाळून तिने गळफास घेतला होता.

लिनाला खानावळीचे पैसे भरण्यास उशीर झाल्यावर तिला साधा नाश्ताही दिला जात ( Crime News) नव्हता. इतर प्रशिक्षणार्थीसमोर अपमानास्पद वागणूक मिळत होती. 'तू काळी आहेस, असं हिणवले जात होती. या सगळ्या प्रकारामुळे लीना तणावात गेली होती, अशी माहिती मिळतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनविसे च्या 2 कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांकडून अटक

Badshah Divorce : बॉलीवूडमध्ये पुन्हा खळबळ! 'या' प्रसिद्ध रॅपरने घेतला ५ महिन्यातच घटस्फोट; ईशा रिखीसोबत नाते संपले

Gold Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर बदलले, वाचा तुमच्या शहरातील 24k, 22k, 18k चे लेटेस्ट रेट्स

अमित ठाकरेंवरील गुन्ह्यानंतर पोलिसांची मोठी कारवाई! मध्यरात्री २ नेत्यांना ठोकल्या बेड्या, राजकारणात खळबळ

Operation Tiger: मोठी बातमी! नवरात्रीआधी ठाकरेंचे १४ आमदार फुटणार, शिंदेसेनेत प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT