Rajsthan Crime  saam Tv
क्राईम

Crime News: लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या; क्राईम पेट्रोलचे १३०० एपिसोड पाहून लावली मृतदेहाची विल्हेवाट

Rajsthan Crime : राजस्थानच्या उदयपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलीय. लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या एका महिलेची तिच्या प्रियकराने हत्या केली. हत्या केल्यानंतर प्रियकराने तिचा मृतदेह लोखंडी ड्रममध्ये टाकून त्याला सिमेंटने पॅक केलं होतं. तब्बल दोन वर्ष त्याने तो ड्रम आपल्या घरात तसाच ठेवला होता.

Bharat Jadhav

Udaipur Crime News :

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. हत्येनंतरही चार वर्ष आरोपी मोकाट फिरत होता. मात्र वर्षांनंतर या हत्येचा उलगडा झाला आणि आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. राजस्थानच्या उदयपूरमधील ही चक्रावून टाकणारी घटना आहे. (Latest News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भानुप्रिया नावाच्या या महिलेचं लग्न झालं होते. मात्र घटस्फोटानंतर ती तिचा राहुल राज नावाच्या प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. भानुप्रिया आणि आरोपी राहुल यांची भेट दिल्लीगेट येथील हनुमान मंदिरात झाली होती. त्यानंतर २०१९ पासून ते दोघे धामंडी येथे एकत्र राहत होता. एकत्र राहत असताना दोघांमध्ये सातत्याने खडके उडत होते. २०२१ मध्ये सततच्या वादातून राहुलने भानुप्रियाची हत्या केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पाहिले १३०० एपिसोड

आरोपीने हत्या केल्यानंतर भानुप्रियाचा मृतदेह लोखंडी ड्रममध्ये ठेवला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कसे लावावे याचा मार्ग तो शोधू लागला. त्यासाठी त्याने युट्यूबवरील क्राईम पेट्रोलचे १३००० एपिसोड पाहिले. परंतु त्याला कोणताच मार्ग सापडला नाही. १२ मे रोजी रात्रभर तो युट्यूबर मार्ग शोधत होता. पण लॉकडाऊन असल्यामुळे त्याला कोणताच मार्ग सापडला नाही. त्यानंतर त्याला युक्ती सुचली आणि त्याने लोखंडी ड्रममध्ये मृतदेह टाकला आणि सिमेंटने त्याला पॅक करून टाकला.

आरोपीने तब्बल दोन वर्षे मृतदेह तसाच राहू दिला. दोन वर्षानंतर जेव्हा ड्रम गंजला आणि त्यातून दुर्गंधी येऊ लागली. काही दिवसांनी घरमालकास दुर्गंधी आल्याने त्याने आरोपीकडे त्याबाबत विचारपूस केली. घरमालकाने सत्यनारायण पालीवाल यांनी राहुलची चौकशी केली. राहुलने घरमालकाला विश्वासात घेऊन संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरवले. दोघांनी मृतदेह ड्रम शेडमध्ये नेऊन जाळला. यानंतर आरोपींनी हाडांची राख नदीत फेकून दिली.

दरम्यान पोलिसांनी अवैध पिस्तुल बाळगल्याप्रकरणी आरोपी राहुल राज याला ताब्यात घेतले असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला. चार वर्षापूर्वी एक महिला त्याच्या सोबत राहत होती, ती बऱ्याच दिवसांपासून बेपत्ता असल्याचे दिसून आले तेव्हा पोलिसांनी राहूल याची चौकशी केली असता चार वर्षापूर्वी झालेल्या हत्येची घटना उघडकीस आली.

काय म्हणाले पोलीस

आरोपीने भानुप्रियाच्या हत्येची कबुली कबुली दिली. भानुप्रिया आणि आरोपी राहुल यांची भेट दिल्लीगेट येथील हनुमान मंदीरात झाली. २०१९ पासून ते धामंडी येथे राहणाऱ्या भानुप्रियासोबत राहत होता. २०२१ मध्ये वादानंतर त्याने तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी क्राईम पेट्रोलचे १३०० एपिसोड पाहिले. त्यानुसार त्याने भानुप्रियाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

SCROLL FOR NEXT