Rajasthan Crime Saam Tv
क्राईम

Crime: धावत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, ११ व्या दिवशी रस्त्याच्या कडेला फेकले; अश्लिल VIDEO बनवले अन्...

Rajasthan Crime: राजस्थानमध्ये भयंकर घटना घडली. एका महिलेचे अपरहण करून तिला ११ दिवस ओलीस ठेवले. या महिलेवर धावत्या कारमध्ये ७ जणांनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Priya More

राजस्थानमध्ये धावत्या कारमध्ये ७ जणांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील बगड तिराया पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही धक्कादायक घटना घडली. आरोपींनी महिलेला ११ दिवस ओलीस ठेवले आणि आळीपाळीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ११ व्या दिवशी या महिलेला बेशुद्धावस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून दिलं. या प्रकरणी पीडित महिलेच्या पतीनेही पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार करूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे पीडित महिलेच्या कुटुंबाने डीएसपी कार्यालय गाठले आहे आणि न्यायाची मागणी केली आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत असे लिहिले आहे की, २५ एप्रिल २०२५ च्या रात्री ती शौचास गेली होती. तेव्हा कारमधून सात जण तिथे आले. त्यांनी जबरदस्तीने तिला कारमध्ये बसवलं आणि तिचे अपहरण केले. आरोपी तिला पनियाला रोडजवळ घेऊन गेले आणि बोलेरोमध्येच आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने प्रतिकार केला. स्वतःला वाचवण्यासाठी ओरडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने तिच्या तोंडाला कापड बांधले. आरोपींनी तिला ११ दिवस ओलीस ठेवले आणि सतत तिच्यावर सामूहिक बलात्कार करत राहिले.

आरोपींनी यादरम्यान महिलेचा अश्लिल व्हिडिओही बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. ११ दिवसांनंतर सर्व आरोपींनी महिलेला रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत सोडून पळून गेले. घटनेनंतर पीडितेने तिच्या कुटुंबाला घटनेबद्दल सांगितले, परंतु आरोपींच्या दबावामुळे आणि भीतीमुळे कुटुंब तक्रार दाखल करू शकले नाही. शेवटी जेव्हा कुटुंबाने धाडस केले आणि बगड तिरया पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले तेव्हा तेथेही पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही.

त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर सातही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास रामगडचे डीएसपी सुनील कुमार शर्मा यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. परंतु अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. पीडितेने तिच्या कुटुंबासह अलवरचे एसपी संजीव नैन यांची भेट घेतली आणि न्यायाची मागणी केली. एसपींनी आरोपींविरोधात लवकरात लवकर कारवाई आणि अटक करण्याचे आश्वासन दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT