Dohale Jevan History: गरोदर महिलेचे डोहाळे जेवण का करतात? कधीपासून सुरू झाली ही प्रथा

Baby Shower Ceremony: डोहाळे जेवण हा गरोदर महिलेचा खास सोहळा आहे. सातव्या महिन्यात केला जाणारा हा कार्यक्रम आई व बाळाच्या आरोग्यासाठी, तिच्या लाडांसाठी आणि परंपरेच्या जपणुकीसाठी साजरा केला जातो.
Baby shower ceremony
Baby shower ceremonySaam Tv
Published On

आई होण्याचं सुख हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात खास असते. गरोदरपणाच्या या नऊ महिन्यात गरोदर महिलेला डोहाळे लागतात असं म्हटलं जातं. कुणाला आंबट खायची इच्छा होते तर कुणाला गोड. काहींना तर तिखट खाण्याचे देखील डोहाळे लागतात. नऊ महिन्याच्या या प्रवासात गरोदर महिलेला कशाचेही डोहाळे लागतात. तुम्हाला आश्चर्यचकित वाटेल पण काहींना माती, खडू खाण्याचे देखील डोहाळे लागले आहेत. असं म्हटलं जातं की पोटातील बाळाला एखादा पदार्थ खाण्याची इच्छा झाली की आईला ते जाणवते.

Baby shower ceremony
Breastfeeding myths: स्तनपानासंबंधीत गैरसमजूतींवर ठेवू नका विश्वास; शंका असल्यास महिलांनी घ्यावा डॉक्टरांचा सल्ला

गरोदर महिलेचं डोहाळे जेवण जुनी परंपरा आजही सुरू आहे. डोहाळे जेवण म्हणजे बाळंतपणाचा आनंदी सोहळा. हा सोहळा गरोदर महिलेच्या सातव्या महिन्यात करण्याची पद्धत आहे. या महिन्यात गरोदरपणामुळे महिलेच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे डोहाळे लागतात. वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा होते. म्हणून तिचे लाडही पुरवले जातात.

डोहाळे जेवण म्हणजे काय?

गरोदर महिलेला गर्भात साधारण पाचव्या महिन्यात बाळाची स्पंदने जाणवू लागतात. बाळाच्या काही इच्छा असतात. त्यानुसार आईला वेगवेगळ्या चवीचे पदार्थ खावेसे वाटू लागतात ज्याला डोहाळे लागणे असे म्हटले जाते. सातव्या महिन्यात बाळाची वाढ पूर्ण झालेली असते. यावेळी बाळाला अधिक अन्न लागते. त्यामुळे महिलेसाठी खास डोहाळे जेवणाचे सोहळा आयोजित केला जातो.

गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिलेनंतर महिलेची चोरओटी भरली जाते. यानंतर सातव्या महिलानंतर रूढी, परंपरेनुसार सर्व नातेवाईक आणि कुटुंब मिळून ओटीभरण किंवा डोहाळे जेवण कार्यक्रम करतात.

Baby shower ceremony
Mental Health : रील्स स्क्रोल करण्याच्या सवयीमुळे मेंदूवर होणारे पाच घातक परिणाम

डोहाळे जेवणाची पद्धत कधीपासून सुरू झाली?

पूर्वी महिलांना कामांमुळे वेळ मिळत नसे. गरोदरपणाच्या सातव्या महिन्यात महिलेला अधिक त्रास होतो. म्हणूनच गरोदरपणानंतर सातव्या महिन्यात गरोदर महिलेचा डोहाळे जेवण सोहळा केला जातो. यानंतर गरोदर महिलेला आरामाची विशेष गरज असते. त्यामुळे पारंपारिक पद्धतीनुसार सातव्या महिन्यात डोहाळे जेवण झाल्यानंतर महिलेला माहेरी पाठवण्याची प्रथा आहे. आजही ही प्रथा सुरू आहे. पूर्वीच्या काळी महिलांना आवडीचे पदार्थ फारसे तितके खायला मिळते नव्हते यामुळे त्यांचे डोहाळे पुरवण्याची प्रथा सुरू झाली. बाळाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी डोहाळे जेवणाचा सोहळा केला जातो. डोहाळे जेवणानंतर गरोदर महिलेला माहेरी पाठवण्यात येते जेणेकरून तिच्या शरीराला विश्रांती मिळून आई व बाळ दोघांचेही आरोग्य उत्तम राहते.

डोहाळे जेवणाचा विधी काय असतो? डोहाळे जेवणात काय असते.

डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात गरोदर महिलेला फुलांना सजवतात. गरोदर महिलेला पतीसह चंद्रावर बसवण्याची प्रथा आहे. यानंतर पानांफुलांनी सजवलेल्या पाळण्यात गरोदर महिलेला बसवून सुवासिनी तिची ओटी भरतात. झोपळ्यावर झुलल्यानंतर ज्याप्रमाणे आनंद मिळतो तसाच आनंद बाळाच्या येण्याने आयुष्यात दरवळत राहो अशी यामागे मनोकामना असते. धनुष्यबाणातून अप्रतिम वातावरण निर्मिती करण्यात यायची त्याप्रमाणे बाळाच्या येण्याने सर्वकाही चांगेल होईल या मनोकामतेतून धनुष्यबाणाची ओटी भरली जाते.

Baby shower ceremony
Tips for glowing skin: सणासुदीच्या काळात चेहऱ्यावर ग्लो हवाय? तज्ज्ञांनी दिलेल्या 'या' सोप्या टीप्स वापरून पाहा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com