Kashedi Ghat Dead Body Saam Tv News
क्राईम

दोन महिन्यापूर्वी कशेडी घाटात तिघांनी संपवलं, मृतदेहाचं गुढ उकललं; रायगडमधील 'त्या' हत्येचं धक्कादायक कारण

Raigad Crime News : एप्रिल महिन्यात रायगडच्या कशेडी घाटात कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचं गुढ उकलण्याकामी पोलादपूर पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी एक महिला आणि तिच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे.

Prashant Patil

सचिन कदम, साम टिव्ही

रायगड : एप्रिल महिन्यात ३० तारखेला रायगडच्या कशेडी घाटात कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचं गुढ उकलण्याकामी पोलादपूर पोलिसांना यश आलं आहे. पैशांची मागणी पूर्ण न झाल्यानं ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून या प्रकरणी एक महिला आणि तिच्या दोन साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुनिल हसे असं मयत व्यक्तीचं नाव असून वंदना पुणेकर (वय ३६), अक्षय जाधव आणि मोहन सोनार (वय ५४) अशी आरोपींची नावं आहेत. मृतदेहाजवळ सापडलेलं ड्रायव्हिंग लायसन्सपासून हा तपास सुरु झाला आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे अक्षय जाधव या आरोपीला बेड्या ठोकल्या. त्यानंतर पोलादपूर पोलिसांनी सांगलीत वेश बदलून राहत असलेल्या वंदना आणि मोहनच्या मुसक्या आवळल्या.

वंदना हिने चिपळूण येथे लिफ्ट मागण्याच्या बहाण्यानं ओळख वाढवून पुढे मैत्री आणि जवळीक साधत पैशाची मागणी केली. मागणी पूर्ण न झाल्यानं या तीन आरोपींनी झोपेच्या गोळ्या देत सुनिल हसे याची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. वंदना पुणेकर, मोहन सोनार आणि अक्षय जाधव या तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता १०३, २३८च्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचवीतल्या चिमुकलीसोबत शिक्षकाचं किळसवाणं कृत्य

रत्नागिरी जिल्ह्यात संतापजनक घटना घडली आहे. जिल्ह्यात दापोली तालुक्यात दाभोळ येथील एका शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करत अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या संतापजनक प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा संतापजनक प्रकार दाभोळमध्ये घडला आहे. या प्रकरणी दाभोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या सगळ्या प्रकरणात गंभीर दखल घेत जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांनी या शिक्षकाचं तातडीने निलंबन केलं आहे. किशोर येलवे असं या नराधम संशयित शिक्षकाचं नाव आहे. पोलिसांकडून त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी रत्नागिरी येथे केली आहे. दाभोळमध्ये एका जिल्हा परिषद शाळेतच्या शिक्षकाने ५वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत अश्लील कृत्य केलं आहे. दाभोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही विद्यार्थिनी घरी निघाली होती. शाळेतील या शिक्षकाने तिची विचारणा करत तुला घरी नेण्यासाठी कोण आलं नाही का? असं विचारलं. त्या मुलीकडून नाही असं उत्तर येताच हा शिक्षकही तिच्या मागोमाग घराकडे गेला. शिक्षकाने त्याच्या दुचाकीवरून तो विद्यार्थिनीच्या घराकडे गेला.

घरी गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की घरी कोणी नाही याचाच फायदा घेत या नराधम शिक्षकाने विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिच्या शरीरावर हात फिरवत लज्जा उत्पन्न होईल अशी अश्लील कृती करत कोणाला सांगू नको अशी धमकीही दिली. घाबरलेल्या या विद्यार्थिनीन घडला प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर घरी आई-वडिलांना हा सगळा प्रकार कळतात त्यांनी थेट दाभोळ पोलीस स्टेशन गाठत या शिक्षकाच्या विरोधात तक्रार दाखल केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT