Nandurbar Crime Sagwan Wood Smuggling Saam Tv
क्राईम

Nandurbar Crime: पुष्पा स्टाईलने सागवान लाकडाची तस्करी; जमिनीत पुरली ११ लाख रुपयांची लाकडं

Nandurbar Crime Sagwan Wood Smuggling: सध्या सातपुड्याच्या जंगलात सुरू असून दिवसेंदिवस सातपुड्यातील मौल्यवान असलेले सागवान आणि खैर जातीच्या झाडांची संख्या कमी होत आहे. तोरणमाळ येथे सागवान लाकडाची पुष्पा चित्रपटाच्या स्टाईलने तस्करी करण्यात आलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सागर निकवाडे, साम प्रतिनिधी

नंदुरबार : तोरणमाळ येथे 'पुष्पा' चित्रपटाप्रमाणे लाकडांची तस्करी केल्याचा प्रकार समोर आलाय. 'पु्ष्पा' चित्रपटातील नायक पुष्पाराज ज्याप्रमाणे पोलिसांच्या तावडीतून वाचण्यासाठी विहिरीत चंदनांची लाकडं लपवतो. त्याचप्रमाणे शक्कल लढवत तोरणमाळ येथील तस्करांनी 'सागवान' लाकडांची तस्कर करत ते जमिनीत पुरुन ठेवले होते. या तस्करांची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर कारवाई करत अधिकाऱ्यांनी ११ लाख रुपयांचे सागवान लाकडं जप्त केली आहेत.

'पुष्पा' स्टाईलने सागवान लाकडांच्या तस्करीचा प्रकार तोरणमाळ येथील जंगलातील कोटबांधणी परिसरात घडला. वन विभागाने ही कारवाई करत ११ लाख रुपयांच्या सागवानी लाकूड जप्त केली आहेत. विशेष म्हणजे लाकूड तस्करांनी जंगलातून तोडलेले लाकडं हे जमिनीत पुरून ठेवले होते. वन विभागाच्या पथकाने तोरणमाळचा जंगलातील कोटबांधणी परिसरात ही धाडीची कारवाई केली.

तस्करांनी जमिनीत पुरुन ठेवलेले सागवानच्या लाकडांचा शोध घेत वनविभागाने जेसीबीच्या माध्यमातून जमिनीत पुरलेले लाकडं बाहेर काढलीत. वन विभागाच्या पथकाने ११ लाख रुपयांचे आठ मीटर सागवानी ३१० दांड्यांसह मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे ड्रोनच्या सहाय्याने तपासणी करत ही कारवाई करण्यात आली आहे.

पुष्पा चित्रपटाला साजेशी लाकडांची तस्करी सध्या सातपुड्याच्या जंगलात सुरू असून दिवसेंदिवस सातपुड्यातील मौल्यवान असलेले सागवान आणि खैर जातीच्या झाडांची संख्या कमी होत आहे. वन विभागाने वेळीच लाकूड तस्करांच्याविरोधात कडक ॲक्शन न घेतल्यास येणारा काळात सातपुड्यात एकही झाड उरणार नसल्याच्या प्रतिक्रिया आता पर्यावरणप्रेमीकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Crime: प्रेमाची थाप मारून पळवून नेलं; नंतर प्रियकर आणि बापाने केले अत्याचार

कामोत्तेजना वाढवणारं बोगस 'कॅप्सुल' औषधचा भांडाफोड; आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ

शासकीय पडीक जमिनींबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना आदेश

पंतप्रधानपदासाठी खासदार फोडले, 2029च्या निवडणुकीसाठी अमित शाहांची तयारी

'ऑपरेशन टायगर' धोक्यात? एकनाथ शिंदेंची खेळी फसणार?

SCROLL FOR NEXT