Pune Crime News: पुण्यात सिनेस्टाईल थरार; दिवसाढवळ्या सोन्याच्या दुकानावर दरोडा, लाखोंचा माल लंपास

Robbery In Gold Shops At Wanwadi: पुण्यातून दरोड्याची एक मोठी बातमी समोर आली आहे. चोरांनी चक्क पोलीस स्टेशन हद्दीतील सोन्याच्या दुकानांवर दरोडा टाकला आहे.
 पुण्यात दरोडा
Pune Crime NewsSaam Tv

सचिन जाधव साम टीव्ही, पुणे

पुण्यातून दरोड्याची एक मोठी बातमी समोर आली आहे. चोरांनी चक्क पोलीस स्टेशन हद्दीतील सोन्याच्या दुकानांवर दरोडा टाकला आहे. पुण्यात वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत सोन्याच्या दुकांनावर दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवसेंदिवस पुण्यात गुन्हेगारी, चोऱ्या अन् दरोड्याचे प्रमाण वाढत आहे.

पुण्यात वानवडी पोलीस ठाणे हद्दीत ७ अनोळखी व्यक्ती मास्क लावून (Robbery In Gold Shops) आले. मोहम्मद वाडी रोड वारकर मळा येथील बीजीएफ ज्वेलर्स या ठिकाणी त्यांनी दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोरांनी ३०० ते ४०० ग्राम सोने लंपास केलं आहे. आरोपी मोटार सायकल वरून पसार झाले आहेत. याप्रकरणी अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.

पुण्यात सिनेस्टाईल थरार पाहायला मिळाला आहे. दरोडेखारांनी दिवसाढवळ्या (Pune Crime News) सोन्याचं दुकान लुटलं आहे. त्यांनी लाखोंचा माल लंपास केल्याची घटना पुण्यात घडली आहे. गुन्हेगारीवर अंकुश बसविण्यासाठी पुणे पोलीस कसून प्रयत्न करत आहेत. मात्र गुन्हेगारीच्या घटनांना काही पूर्णविराम मिळत नसल्याचं पाहायला मिळत आहे. शस्त्राचा धाक दाखवत पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकला.

वानवडी विभागाचे डीसीपी आर राजा, गुन्हे शाखा डीसीपी यांच्यासह स्थानिक पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली (crime news) आहे. फरार झालेल्या दरोडेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत. सीसीटिव्ही पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याआधारे पोलीस आरोपीचा तपास करत आहेत

 पुण्यात दरोडा
Pune Cyber Fraud: धक्कादायक! शेअर ट्रेडिंमधून पैसा कमावण्याचे आमिष; पुण्यातील हॉटेल व्यावसायिकाला ४३ लाखांचा गंडा

या महिन्यात सलग तीन दिवस तीन खूनाच्या घटना पाहायला मिळाल्या आहेत. एकीकडे कोयता गॅंगची दहशत वाढत चालली (Pune News) आहे, तर दुसरीकडे शहरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा वावर असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच पुण्यात चौथ्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर आता दिवसाढवळ्या सोन्याच्या दुकानात लुट झाल्याची घटना घडली आहे.

 पुण्यात दरोडा
Thane Crime News: धक्कादायक! मुंबईत धावत्या ट्रेनमध्ये मॉडेलवर अत्याचार; घटनेनंतर ३९ दिवसांनी गाठले पोलीस ठाणे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com