क्राईम

Shocking : गर्लफ्रेंडला भेटायला बॉयफ्रेंड हॉटेलवर गेला; दोघांचा वाद झाला, मॅनेजरचा जीव गेला, नेमकं काय घडलं?

Punjab Crime News : पंजाबमध्ये गर्लफ्रेंडला भेटण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाने हॉटेल मॅनेजरची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • पंजाबमध्ये हॉटेल मॅनेजरची हत्या

  • प्रेमप्रकरणातून वाद वाढला

  • नशेत आरोपीने धारदार शस्त्राने खून केला

  • पोलिसांनी आरोपीला अटक केली

Punjab Hotel Manager Murder News पंजाबमध्ये एका हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडला भेटायला आलेल्या तरुणाने हॉटेलच्या मॅनेजरची हत्या केली असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आरोपीची गर्लफ्रेंड त्याच हॉटेल मध्ये काम करत असल्याचे वृत्त आहे, तसेच ती त्याला लग्नासाठी नकार देत असल्याने तो नशेत तिला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये आला होता. मात्र मॅनेजरने भेटण्यासाठी नकार दिल्याने आरोपीने त्याची धारदार शस्त्राने हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव व्यास असे आहे. व्यासची गर्लफ्रेंड पंजाबमधील एका नामांकित हॉटेलमध्ये काम करत होती. तो बऱ्याच काळापासून तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता, पण तिने नकार दिला होता. गुरुवारी, तो तिला भेटण्यासाठी नशेत हॉटेलमध्ये आला. रिसेप्शनवर असलेल्या हॉटेल कर्मचारी जीतू आणि त्याचा मित्र सचिन यांच्याशी गर्लफ्रेंडला भेटण्यावरून त्याचा वाद झाला. त्यानंतर त्या दोघांनी व्यासला हॉटेलमधून बाहेर काढले.

संतप्त झालेल्या व्यसने त्याच्या मित्राच्या मदतीने हॉटेलच्या मॅनेजरची निर्घृण हत्या केली. हॉटेलच्या दारात सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. व्यास नशेत असल्याने त्याला थोडा वेळासाठी काय घडले हे समजलेच नाही. या हत्येने हॉटेलच्या परिसरात गोंधळ उडाला. याप्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, आणि आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये मुख्य आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले असून व्यासाच्या मित्राने घटनस्थळावरून पळ काढला. दरम्यान या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस या या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! आता मोठं काही तरी घडणार? ठाकरे गटाकडून सर्व खासदारांना व्हीप जारी

Digital Code: बारकोड आणि क्यूआर कोड यांच्यामध्ये काय फरक आहे?

Boiled Potato: शिळा उकडलेला बटाटा खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात?

Maharashtra News Live Update: खासदार संजय देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त

सामाजिक, राजकीय आंदोलनातील 44 खटले मागे; मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय

SCROLL FOR NEXT