Pune Crime Saam tv
क्राईम

Pune Crime : येरवडा भागात ५ जणांच्या टोळक्याकडून वाहनांची तोडफोड; दहशत माजविण्याचा प्रयत्न

Pune News : धमकी देवून हवेत कोयता फिरवुन दहशत निर्माण केली. पुण्यातील येरवडा परिसरात हा प्रकार घडला आहे.

Rajesh Sonwane

अक्षय बडवे 

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा अल्पवयीन तरुणांच्या हाती कोयते आल्याचे पाहण्यास मिळाले आहे. येरवडा परिसरात हातात कोयते घेऊन दहशत माजविण्याचा इराद्याने आलेल्या ५ जणांच्या टोळक्याने परिसरात (Pune) उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. याबाबत  ४० वर्षीय महिलेने या संदर्भात पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दिली आहे. (Tajya Batmya)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि या प्रकरणातील आरोपी एकमेकांना ओळखत असून फिर्यादीच्या घरासमोर त्यांचे हातातील (crime News) कोयत्यांनी व दगडांनी घरासमोर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. तसेच आरडाओरडा करून जमलेल्या लोकांना तुम्ही याठिकाणी थांबू नका; नाही तर तुम्हाला देखील सोडणार नाही अशी धमकी देवून हवेत कोयता फिरवुन दहशत निर्माण केली. पुण्यातील येरवडा परिसरात हा प्रकार घडला आहे. 


('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाचही अल्पवयीन मुले ताब्यात 

घडलेल्या या प्रकाराबाबत पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनमध्ये सहा जणांच्या विरोधात विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात पोलिसांनी तत्काळ कारवाई केली असून हे सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Online Train Ticket booking : रेल्वेचा मोठा निर्णय; तत्काळचा नियम आता आरक्षित तिकीटालाही, १ ऑक्टोबरपासून होणार लागू

Bone Glue: हात-पाय मोडले तरी लगेच जुळतील? 2 मिनिटांत हाडं जोडणारा बोन ग्लू?

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

Solar Eclipse 2025: सूर्यग्रहणाच्या दिवशी दान करा 'या' गोष्टी, होतील अनेक लाभ

Mumbai Rain: स्वत:चा जीव धोक्यात घालून पाण्याला करून दिली वाट, बीएमसी कर्मचाऱ्याचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT