Swargate Bus Depot Case  Saam Tv
क्राईम

Swargate Bus Deopt Case: पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरण; दत्तात्रय गाडेविरुद्ध ८९३ पानांचं दोषारोपपत्र दाखल

Swargate Bus Depot Case Accused Dattatray Gade: पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपी दत्तात्रय गाडेविरुद्ध दोषारोपत्र न्यायालयात दाखल केलंय. पोलिसांनी ५२ दिवसात या प्रकरणाचा तपास पूर्ण केला होता.

Bharat Jadhav

पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणी नवीन अपडेट आलीय. आरोपी दत्ता गाडे याच्याविरोधात पुणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी ८९३ पानांचे हे दोषारोपपत्र दाखल केलंय. आरोपी दत्तात्रय गाडेच्या विरुद्ध शिवाजनगर येथील सत्र न्यायालयात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ५२ दिवसात तपास पूर्ण करत आज दोषारोपपत्र दाखल केलंय.

स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात २५ फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता गाडेने एका मुलीवर अत्याचार केला होता. परगावी निघालेल्या एका प्रवासी तरुणीला आरोपी गाडेने वाहक असल्याची बतावणी करत तिच्यावर अत्याचार केला होता. आरोपी गाडेने एका शिवशाही बसमध्ये नेत तिच्यावर बलात्कार केला होता. पीडिता मुलगी फलटणला जात होती, त्यावेळी आरोपी दत्तात्रय गाडेने तिला चुकीच्या शिवशाहीत बसमध्ये बसण्यास सांगितलं.

त्या शिवशाही बसमध्ये कोणीच नव्हतं. अंधाराचा फायदा घेत त्या बसमध्ये दत्तात्रय गाडेने फलटणाला जाणाऱ्या मुलीवर दोनदा अत्याचार केला. त्याने तरुणीला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर दोनदा बलात्कार केला. या घटनेचे राज्यात पडसाद उमटले होते. परंतु या गुन्ह्यामध्ये आरोपीचे मोबाईल अद्याप पोलिसांना सापडलेला नाहीये.

पोलिसांचा गणवेश घालून फिरायचा

आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांचा गणवेश घालून फिरत असायचा, अशी माहिती पोलीस तपासात समोर आलीय. गाडेकडे असलेल्या मोबाईल फोनमध्ये पोलीस गणवेश परिधान केलेले फोटो पोलिसांना मिळाले होते.

पुणे, पिंपरी चिंचवडमधील बसस्थानकांबाबत महत्त्वाचा निर्णय

पुण्यातील स्वारगेट अत्याचार झाल्याची धक्कादायक घटनेने महाराष्ट्र हादरून गेला. या घटनेनंतर बसस्थानकातील सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर आता बसस्थानकातील सुरक्षेचा अभाव समोर आल्यामुळे आता विविध उपाययोजना करण्यास महामंडळाने सुरवात केलीय. पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील १४ आगारांतर्गत असणाऱ्या ४२ बसस्थानकांच्या हद्दीतील १०० बस थांबे संवेदनशील थांबे म्हणून निश्चित करण्यात आलेत. त्या ठिकाणी प्रतिबंधनात्मक उपायोजना करण्यासाठी पोलिस आयुक्तांना पत्रव्यवहार करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

कार मंदिरात घुसली; ५-६ जणांना चिरडलं, दोघांचा मृत्यू, पायऱ्यांवर रक्ताच्या थारोळ्या | Chhatrapati Sambhajinagar

The Traitors Winner: उर्फी जावेद आणि निकिता लूथर ठरले 'द ट्रेटर्स'चे विजेते; ट्रॉफीसह मिळाणार कोट्यावधींचे बक्षीस

SCROLL FOR NEXT