School Bus Accident Pune Saam Tv
क्राईम

Accident News : दैव बलवत्तर! पिकअपची जोरदार धडक, स्कूल बसमध्ये आरपार घुसल्या लोखंडी सळ्या

School Bus Accident Pune: पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात स्कूल बसला लोखंडी सळ्या वाहतूक करणाऱ्या पिकअपने मागून धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Alisha Khedekar

  • पुणे-सोलापूर महामार्गावर शाळेच्या बसला पिकअपची मागून धडक

  • या अपघातात लोखंडी सळ्या बसमध्ये आरपार घुसल्या

  • सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.

  • स्कुलबसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

पुणे- सोलापूर महामार्गावर मोठा अपघात घडला आहे. या अपघातात स्कुल बस व लोखंडी सळ्या वाहतूक करणाऱ्या पिकअपची धडक झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. हा अपघात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. मात्र हा अपघात कशामुळे झाला हे अनुत्तरित आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे- सोलापूर महामार्गावर 'ऑलिंपस स्कुल ऑफ एक्सलन्स' या संस्थेची स्कुल बस पुणे बाजूकडून उरुळी कांचन बाजूकडे निघाली होती. याचदरम्यान सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतून लोखंडी सळ्या वाहतूक करणारा पिकअप जात होता. याचदरम्यान या पिकपने स्कुल बसला मागून धडक दिली.

या धडकेत पिकअप मधील सळ्या पुढे असलेल्या स्कुल बसमध्ये आरपार घुसल्या. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र स्कुल बस चालकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घडलेल्या घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. या बघ्यांपैकी एका नागरिकाने सांगितल्यानुसार, पिकअपच्या मागे असलेल्या एका हायवाने धडक दिली.

नेमका हा अपघात कशामुळे झाला हे अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान सदर घटनेची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीवरून पोलीस या अपघाताचा सविस्तर तपास करत आहे. दैव बलवत्तर म्हणून या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. मात्र हा अपघात अंगावर काटा येण्याइतपत गंभीर होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोयाबीनची नोंदणी सुरू होताच सर्वर डाऊनचा शेतकऱ्यांना फटका

Relationship Tips: संशय अन्...; 'या' ३ चुका वेळीच टाळा, नाहीतर नात्यात येईल दुरावा

कार शिकताना भयंकर घडलं; ब्रेकच्या ऐवजी एक्सीलेटर दाबला, ट्रकला जोरदार धडक; चौघांचा जागीच मृत्यू

Actor Bike Stunt: ७१ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्याचे रस्त्यावर खतरनाक बाईक स्टंट; FIR दाखल झाल्यानंतर मागितली माफी

Shocking: हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय, पोलिसांच्या धाडीत ४ जणी सापडल्या; २ रशियन तरुणींनी खिडकीतून उड्या मारल्या, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT