Maval News Saam Tv
क्राईम

Shocking : अरे देवा! गाडीवरून आले, आजूबाजूला पाहिलं; नंतर हळूच सिलिंडर चोरून पळ काढला

Maval News : मावळमध्ये भरदिवसा गॅस सिलिंडर चोरीची धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरांनी हॉटेल कामगाराची नजर चुकवून सिलिंडर लंपास केला.

Alisha Khedekar

  • मावळमध्ये भरदिवसा गॅस सिलिंडर चोरीची घटना घडली आहे.

  • दुचाकीवरून आलेल्या दोन चोरांनी पत्र्याखालून सिलिंडर लंपास केला आहे.

  • चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे.

  • प्रकरणी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

मावळमधून चोरीची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. देहूरोडमध्ये हॉटेल कामगाराने नजर चुकवून घरगुती गॅस सिलिंडर चोरून नेल्याची घटना घडली आहे. भर दिवसा दुचाकी वरून आलेल्या दोन चोरट्यांनी सिलिंडर वर हात साफ केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पुर्वी चोर चोरी करण्यासाठी रात्री अपरात्री येत असत परंतु आता चोरांची चोरी करण्याची पद्धत, काळआणि वेळ सर्व बदललं आहे. चोरांनी सुद्धा जुन्या पद्धती मोडीस काढत नव्या पद्धतींचा मार्ग अवलंबत आहेत. अशीच एक चकित करणारी घटना मावळमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विकास नगर येथील असलेल्या रोहित चायनीज सेंटरचे मालक कपील अशिवाल यांच्या चायनीज सेंटरमधील सिलिंडर संपले होते. भरलेल्या सिलिंडरची गाडी आल्यावर मोकळे देऊन सिलिंडर घेण्यासाठी आशिवाल यांनी सिलेंडर चायनिज दुकाना बाहेर एका पत्र्याच्या मागे झाकुन ठेवले होते.

एवढया अडचणीत ठेवलेल्या सिलिंडरवरही चोराची नजर पडलीच. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरांनी हॉटेल कामगाराची नजर चुकवून पत्र्याखाली लपवलेले सिलिंडर लंपास केले. दोन्ही चोरांनी आपली ओळख पटू नये यासाठी डोक्यावर टोपी आणि तोंडाला रुमाल बांधला होता. सिलिंडर भोवती घिरट्या मारून काही क्षणातच दुचाकी वरून आलेल्या या चोरांनी सिलिंडर लंपास केला.

घडलेला सगळा प्रकार घटना समोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रिकॉर्ड झाली आहे. या प्रकरणी रोहित चायनीज सेंटरच्या मालकांनी चोरट्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. आता या व्हिडिओ क्लीपच्या आधारे सिलेंडर चोरांना पकडण हे पोलीसांना एक आव्हान ठरणार आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shocking: दुःख डोंगराएवढं! आजारी मुलानं बापाच्या कुशीत डोळे मिटले, धक्का सहन न झाल्यानं बापाचाही हार्ट अटॅकनं मृत्यू

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

SCROLL FOR NEXT